बार्शी – रुग्णांच्या न्याय्य हक्कांचे व आरोग्यसेवेतील अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत असलेल्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी बार्शी येथील जुबेर युनूस बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष ॲड. निलेश करमुडी, प्रदेशाध्यक्ष हणमंत गोत्राळ, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण यांच्या सुचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली.
जुबेर बागवान यांचा कार्यकाळ २२ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२७ असा राहणार आहे. रुग्णांना योग्य न्याय मिळवून देणे, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे तसेच समितीचे सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल जुबेर युनूस बागवान यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या माध्यमातून रुग्ण हक्क संरक्षण समितीचे कार्य सोलापूर जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post Views: 16