सोलापूर – माहेरून पाच लाख रुपये हुंडा आण म्हणून एका विवाहितेस शारीरिक व मानसिक छळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती सह तिघा जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम- पती, देवंता- सासु, माहेश्वरी- नणंद, (सर्व रा. कात्रज, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत अपर्णा शुभम कांबळे(रा. मल्लिकार्जुन नगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी दि. २९ मार्च २०२६ पासुन ते तीन महिने पर्यंत सासरी नांदत असताना वरील आरोपींनी मिळुन फिर्यादीस पुणे येथे नवीन घर घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये हुंडयासाठी आण म्हणून शारीरीक व मानसिक त्रास दिला . व लाथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 3