सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सोलापूर दौऱ्यानिमित्त आगमन झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
स्वागत प्रसंगी राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, विक्रम देशमुख, नगरसेवक अक्षय आजीखाने, नागेश खरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्षांच्या स्वागतानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्याशी संवाद साधत सोलापूर शहर – जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोलापूर भेटीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
Post Views: 15