पंढरपूर – श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयातील ३६ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एमएचटी सीइटी २०२६ च्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले. त्याबद्दल संस्था व प्रशालेच्या वतीने या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर हे होते त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून यश म्हणजे त्यांच्या जिद्दीच्या आणि पालकांच्या संस्कारचे फळ असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे खजिनदार सलीम वडगावकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना कठीण परिस्थितीत आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास यश नक्की मिळते असे प्रतिपादन केले.
यावेळी प्राचार्य डॉ.यु.आर मुंढे यांनी यावर्षी मिळालेले हे नेत्रदीपक यश म्हणजे विवेक पॅटर्नच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाचे फलित असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा आणि डिजिटलायसन्स याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य ई.जी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख व्हि.डी.चौगुले तसेच ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.पी.पी.पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार डी.एच.करचे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 12