अकलूज – मराठा आरक्षण व त्याअनुषंगिक मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने वेळापूर येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ६ दिवसांचा एल्गार पुकारण्यात आला असून, त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत वेळापूर येथे हे आंदोलन करण्यात आले.
वेळापूर येथील पालखी चौकात, आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावरील ओव्हरब्रिजवर व त्याखालील चौकात हे आंदोलन झाले. यामुळे पंढरपूर, इंदापूर, अकलूज व सांगोला मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
खांद्यावर भगवी उपरणी व हातात भगवे ध्वज घेऊन आलेल्या आंदोलकांनी पुलावर आणि पुलाखाली चारही बाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर ठिय्या मारला. यावेळी ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘एक मराठा, कोटी मराठा’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलकांनी ठरलेल्या वेळेत शांततेत आंदोलन आटोपते घेतले. यावेळी निवासी नायब तहसीलदार सिद्धार्थ जावीर, मंडल अधिकारी संदीप चव्हाण, तलाठी सावता गोरे, तसेच वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे उपस्थित होते.
विशेष म्हणजे आंदोलकांनी वेळापूर येथील एका दोन वर्षीय मुलीच्या हस्ते प्रशासनाला आपले निवेदन दिले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी स्वतः पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत केली.
मराठा आरक्षण व त्याअनुषंगिक मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने वेळापूर येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Post Views: 8