अक्ककलकोट – आई तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मनाला विलक्षण ऊर्जा व शांती मिळाली. मंदिर समितीचे नियोजन व भाविकांसाठीच्या सोयी-सुविधा कौतुकास्पद आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज आणि आई भवानीच्या कृपेने सर्वांचे कल्याण होवो व महाराष्ट्रावर आई तुळजाभवानीची
कृपादृष्टी सदैव राहो हीच प्रार्थना करीत आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सुध्दा प्रेरणा देणारी आई तुळजाभवानी ही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याचे मनोगत येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले.
आज नगरसेवक महेश इंगळे यांनी
तुळजापूूर येथील आई तुळजाभवानी मंदीरास भेट देऊन आई तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी तुळजाभवानी मंदिर समिती संस्थानचे पीआरओ सचिन साळुंखे, पुजारी रामभाऊ छत्रे यांनी महेश इंगळे यांचा
आई तुळजाभवानी देवीची प्रतिमा, श्रीफळ देवून यथोचित सत्कार केला.
यावेळी महेश इंगळे बोलत होते. यावेळी तुळजाभवानी देवस्थानचे धार्मिक विधी प्रमुख शितोळे साहेब, चंद्रकांत पवार,
बाळासाहेब एकबोटे, संदीप पंडित, मनोज जगताप सर, ज्ञानेश्वर भोसले, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, रमेश शिंदे सर, स्वामीराव मुसळे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
Post Views: 10