मोहोळ – ग्रामदैवत सद्गुरु नागनाथ महाराजांच्या यात्रेस शुक्रवारी दि.१७ एप्रिल रोजी प्रारंभ झाला असून मंदिरात श्री पारंपारिक पद्धतीने व संत मंडळीच्या अभंग गायनाने अभिषेक करण्यात आला. यावेळी सुगंधित तैल स्नान घालून पंचामृताचा अभिषेक करण्यात आला . तेल लावण्याच्या कार्यक्रमानंतर बाशिंग बांधून राजेंद्र बुवा खर्गे महाराजांना कंकण बांधण्यात आले
त्यानंतर पारंपारिक व यात्रा मार्गावरून खर्गे महाराजाची संवाद्य मिरवणूक आणि संत मंडळीच्या अभंग गायनाने काढण्यात आली . या मार्गावरील सर्व देवतास लिंबाच्या फाट्याच्या माळा घालून खडीसाखर व गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करून देवतास आवाहन करण्यात आले . यामध्ये विठ्ठल मंदिर, जगदंबा मंदिर, महादेव मंदिर, खर्गतीर्थ म्हसोबा, काकडे पार, जुनी वेस, मुंगीचा धोंडा या मंदिराचा समावेश होता. सर्व देवतास यात्रेस येऊन यात्रा निर्विघ्न पणे पार पाडावी अशी प्रार्थना करण्यात येते.
शेवटी श्रीच्या मंदिरात महाआरती व हेग्रसवंशज अरुण काका मोहोळकर यांच्या घरी तयार करण्यात आलेल्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.या सर्व कार्यक्रमास देशमुख, देशपांडे,गायकवाड, मोहोळकर, स्वामी,खर्गे, शेटे,वाले, कुर्डे,गावडे बारगजे, काकडे, काळे, दाईंगडे, सुतार,तोडकरी घोंगडे आदलिंगे मोहोळकर आदीसह सर्व मानकराच्या घराण्यातील वंशज संत मंडळी भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























