वैराग – दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर, बळेवाडी (तालुका बार्शी) येथे नवरात्र महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिनाचे औचित्य साधून ‘नवदुर्गा शक्ती सन्मान सोहळा’ अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी नानासाहेब कदम यांच्या मोलाच्या व प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी ‘एकता महिला मंच’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व परिसरातील मान्यवरांची आवर्जून उपस्थिती लाभली होती.
९ कर्तबगार ‘नवदुर्गांचा’ स्वाती डोईफोडे यांच्या हस्ते गौरव
सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रात आपल्या अतुलनीय कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या एकता महिला मंचच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ग्रामीण भागातील ९ महिलांना या सोहळ्यात “नवदुर्गा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस पोलिस अंमलदार स्वाती डोईफोडे यांच्या शुभहस्ते या सर्व नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले.
सन्मानित झालेल्या ‘नवदुर्गा’:
१. लक्ष्मी सुतार (प्रमुख पदाधिकारी, एकता महिला मंच)
२. गीतांजली जोशी (प्रमुख पदाधिकारी, एकता महिला मंच)
३. रंजना गवळी (प्रमुख पदाधिकारी, एकता महिला मंच)
४. राजश्री बानगुडे (प्रमुख पदाधिकारी, एकता महिला मंच)
५. लक्ष्मी मोरे (प्रमुख पदाधिकारी, एकता महिला मंच)
६. मिनाक्षी यादव (ग्रामीण शेतकरी महिला)
७. डॉ. शितल कागदे
८. सुषमा काळदाते
९. संध्या चवरे व सुगंधा आगवणे (एकूण ९ दुर्गांचा गौरव) आयोजक मा. नानासाहेब कदम (सेवानिवृत्त Dysp) यांची प्रतिक्रिया “ग्रामीण भागातील महिलांचे विविध क्षेत्रांतील कार्य अतिशय अतुलनीय आणि कौतुकास्पद आहे. नवरात्र महोत्सव व आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिनाचे औचित्य साधून त्यांच्या या कार्याला पाठिंबा मिळावा, योग्य सन्मान व्हावा आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, याच उद्देशाने या नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पुढील काळातही महिलांचे सक्षमीकरण, त्यांचा रोजगार आणि
समाजाला नवी दिशा देणारे, प्रेरणादायी उपक्रम राबवून
महिलांना नवनिर्माणाची ताकद देण्याचे कार्य आम्ही या माध्यमातून निरंतर करत राहू.” प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
एकता महिला मंचच्या प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा असा भव्य सन्मान केल्याबद्दल संपूर्ण बार्शी तालुक्यातून व बळेवाडी परिसरातून या उपक्रमाचे अत्यंत कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सर्व सन्मानप्राप्त नवदुर्गांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Post Views: 11