
श्रीपूर – वेळापूर ता. माळशिरस येथिल जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नवनाथ माने (वय ४३वर्ष ) यांनी जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात जुन्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेड्स मॅरेथॉनम स्पर्धे मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ९० किलोमीटरची खडतर स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते पीटरमॅरिट्सबर्ग या दोन शहरांदरम्यान आयोजित करण्यात आलेली ही ऐतिहासिक स्पर्धा रविवारी दि. १४ जून रोजी पार पडली. यावेळी स्पर्धेचा मार्ग डर्बन ते पीटरमॅरिट्सबर्ग असा चढाचा (अप-रन) होता. तब्बल ९० किलोमीटर अंतर आणि सुमारे १,७५० मीटर उंच चढाव असलेल्या या स्पर्धेत जगभरातील सुमारे २२ हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. भारतातून २७० स्पर्धक सहभागी झाले होते, त्यामध्ये २२ महिला धावपटूंचा समावेश होता.
शिक्षक श्री नवनाथ माने यांनी ही आव्हानात्मक स्पर्धा १० तास १० मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत ब्रॉझ पदक पटकावले . रनहोलिक्स ग्रुपचे मार्गदर्शक डॉ.योगेश सातव व माळशिरस फिटनेस ग्रुप चे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल वेळापूर सह संपूर्ण जिल्ह्यातून नवनाथ माने सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 9