पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील मुढवी येथे घडलेल्या प्रकरणातील आरोपीस पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केलेला आहे.
यात हकीकत अशी की, मंगळवेढा तालुक्यातील मुढवी येथे जमिनीच्या वादातून फिर्यादी सुनिता धोंडीराम शिवपुजे या शेतामध्ये काम करीत असताना आरोपी रविंद्र महादेव शिवपुजे हा शेतामध्ये आला व फिर्यादी व तिचे पती- धोंडीराम यांना शिवीगाळ करु लागला व फिर्यादीचे शेतातील मोटारची तोडफोड केली व हातात कोयता घेवून आला व फिर्यादी व तिचे पती यांना म्हणाला की, तुम्ही या शेतात यायचे नाही व शेती करायची नाही. मी तुम्हाला येथे राहू देत नाही असे म्हणून शिवीगाळ करु लागला. व त्यावेळी आरोपीस फिर्यादी विचारले की, शिवीगाळ का करीत आहे, त्यावेळी आरोपीने हातातील कोयता फिर्यादीचे डोक्यात घालून जीवे ठार मारणेच्या उद्देशाने फिर्यादीस जखमी केले, अशा आशयाची फिर्याद मंगळवेढा पोलीस स्टेशन गु.र. न.-342/2026 फिर्यादीने आरोपीविरुद्ध दाखल केली.
सदर गुन्हा दाखल झालेनंतर आरोपीस पोलीसांनी दि. 07/05/2026 रोजी अटक करून मा.न्यायालयात हजर केले. त्यानंतर मा. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडीचा आदेश केला. त्यानंतर आरोपी ने वकीलामार्फत पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयाकडे नियमित जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे म्हणणे दाखल करुन युक्तीवाद करण्यात आला.
सदर आरोपीतर्फे ॲड. तुषार रोकडे यांनी युक्तीवाद करून न्यायालयास आरोपी हा निष्पाप असलेचे सकृतदर्शनी दाखवून दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण न्यायनिवाडे दाखल करून आरोपीची बाजू न्यायालयासमोर भक्कमपणे मांडली. सदर युक्तीवाद ग्राह्य धरून पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.सलगर साहेब यांचे कोर्टाने आरोपीस नियमित जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणात आरोपीचेवतीने ॲड. तुषार रोकडे यांनी काम पाहिले.
Post Views: 9