Friday, July 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आपण कितीही मोठे झालो तरी माणूसची जपली पाहिजे – पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in editor
0
आपण कितीही मोठे झालो तरी माणूसची जपली पाहिजे – पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आपण ज्ञानी असून उपयोग नाही तर माणूसही असायला हवे. आपण कितीही मोठे झालो तरी माणुसकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री तथा राज्यसभेचे खासदार अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.

          मंगळवारी, प्रा. ठाकरे गौरव संस्था, संगमेश्वर महाविद्यालय आणि लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने आयोजित संगमेश्वर महाविद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सभागृहाचे उद्घाटन आणि ‘राष्ट्रीय गणितरत्न पुरस्कार’ वितरण सोहळ्यात पद्मश्री अ‍ॅड. निकम बोलत होते. विज्ञान संस्था बंगळुरू येथील प्रा. वामसी प्रीतम पिंगाली यांना गणितरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी हायड्रोलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे होते. याप्रसंगी विचारपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय माने, संस्थेच्या सचिव ज्योती काडादी, माजी कुलगुरू तथा प्रा. ठाकरे गौरव संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. के. ठाकरे, प्राचार्य प्रा. ॠतुराज बुवा उपस्थित होते.

         संस्थेच्या कामात काही असंतुष्ट मंडळींकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची खंत धर्मराज काडादी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली होती. तोच धागा पकडून पद्मश्री अ‍ॅड. निकम म्हणाले, आपण पुढे जात असताना अनेक शत्रू तयार होत असतात. अनेक निंदक तयार होत असतात. आपल्या प्रगतीबद्दल असूया असलेली माणसे त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्याकडे लक्ष न देता आपण काम करायला हवे, असा सल्लाही अ‍ॅड. निकम यांनी पुढे बोलताना दिला. तुमच्या वाटचालीत काही अडचणी आल्यास मी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहीन, अशी ग्वाही अ‍ॅड. निकम यांनी देताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

           कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रा. ॠतुराज बुवा यांनी केले. लक्ष्मी हायड्रॉलिक्सच्या संचालिका सुप्रिया ठाकरे यांनी सत्कारमूर्ती प्रा. वामसी यांच्या सन्मानपत्राचे वाचन केले. प्रा. बाळासाहेब वाफरे यांनी प्रा. ठाकरे गौरव संस्थेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी धुमाळ यांनी केले. मधुकर पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी, शरणराज काडादी आणि काडादी परिवार, लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे संचालक आदित्य ठाकरे आणि ठाकरे परिवार, श्री सिध्देशर देवस्थानचे विश्वस्त, सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक यांच्यासह श्री सिध्देश्वर शिक्षण संकुलातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उदात्त परंपरेचा गौरव : काडादी

राष्ट्रनिष्ठ व देशभक्तीने प्रेरित होऊन आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी अर्पण केलेल्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांचे नाव सभागृहाला दिले जाणार असल्याने त्यांच्यासारखेच समर्पित भावाने देशसेवा केलेल्या व्यक्तीच्या हस्ते हा सोहळा व्हावा ही आमची ÷इच्छा होती. भारतीय न्यायव्यवस्थेतील धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यारूपाने ती इच्छा पूर्ण झाल्याचे संगमेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी सांगितले. हा सोहळा केवळ एका सभागृहाच्या उद्घाटनापुरता मर्यादित नसून एका उदात्त परंपरेचा गौरव आहे. एका कर्मयोगीच्या चिरंतन कार्याला अर्पिलेली ही आदरांजली असल्याचेही काडादी यांनी सांगितले.

आगामी काळ गणिताचा सुवर्णकाळ : प्रा. पिंगाली

गणिताबद्दल खूप गैरसमज आहेत. इतर विषयांच्या तुलनेत गणित दुर्लक्षित आहे. मात्र, प्रा. ठाकरे गौरव संस्थेने गणिताला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सत्कारमूर्ती प्रा. वामसी पिंगाली यांनी सांगितले. एआय तंत्रज्ञानाने कवेत घेतलेला हा काळ गणितासाठी सुवर्णकाळ असल्याचा विश्वासही प्रा. पिंगाली यांनी व्यक्त केला.

गणितासह नवरत्न पुरस्कार देणार : ठाकरे

प्रा. ठाकरे गौरव संस्थेच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर गणितरत्न पुरस्कार दिला जातो. आता पुढील वर्षापासून वैद्यकीय , कृषी आणि इतर विज्ञान शाखांतील उल्लेखनीय योगदानासाठी नवरत्न पुरस्कार देणार असल्याची घोषणा शरद ठाकरे यांनी केली. या पुरस्कारांसाठी निवड प्रक्रिया नोबेलच्या धर्तीवर पारदर्शकपणे होईल. सोलापुरातच या पुरस्कारांचे वितरण होईल असेही ठाकरे यांनी सांगितले

Post Views: 75
Previous Post

गावच्या यात्रेत नृत्यांगना व डीजे बंदीसाठी रणरागिणी सरसावल्या

Next Post

नालंदा जिल्ह्यात शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला.

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नालंदा जिल्ह्यात शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

July 3, 2026
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

July 3, 2026

बाशी नगरपरिषदेचे सोपल गटाचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक पठाण यांचे पद रद्द होणार 

July 3, 2026
सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

July 3, 2026

‘नमामी चंद्रभागा योजना केवळ आणि केवळ कागदावरच ? 

July 3, 2026
देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

July 3, 2026
महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

July 3, 2026

सांगोल्यातील आपुलकीला महिनाभरात जमा झाला ३६ हजार रुपयांचा निधी

July 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0956357

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!