पंढरपूर – चूल आणि मूल एवढ्यात अडकून पडलेल्या खास महिलांनी एकत्र यावे व त्यांचा विरंगुळा व्हावा या उद्देशाने श्री रुक्मिणी विद्यापीठ या संस्थेच्या वतीने मातोश्री ईश्वरम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर या प्रशालेत खास महिलांसाठी व मुलींसाठी महाभोंडल्याचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्था सचिवा सुनेत्राताई पवार यांचे व महिलांचे हस्ते हत्तीची विधीवत पूजा करून या महाभोंडल्यास सुरुवात करण्यात आली.
यामध्ये महिलांनी सूप नाचवणे, घागर फुंकणे ,फुगे फुगवणे याबरोबर दांडिया नृत्य तसेच एलमा पैलमा गणेश देवा, अक्कण माती चिक्कण माती या गाण्याबरोबर सर्व महिलांनी व मुलींनी फेर धरून गाणीही गायली सर्वांनी ही गाणी खेळ मोठ्या आयटीत आणि चालीत गानिगात मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात हा महाभोंडला साजरा झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना सुनेत्राताई पवार म्हणाले की दुष्काळाची दाहकता बघता सर्वांनी पाणी बचतीचा आणि जल संवर्धनाचा संकल्प करावा सर्वांनी घरातील भाजी तांदूळ धुतलेले पाणी आपल्या परिसरातील झाडांना घाला असे आवाहन करुन सर्वांनी आपल्या संस्कृती जतना बरोबर नाती टिकवण्याचेही सर्वांना आवाहन केले.
कार्यक्रमाच्या खास निवेदिका डॉ.वनिता घाडगे यांनी त्यांच्या सुश्राव्य बोलण्याने अनेक महिलांना प्रोत्साहित करून महिलांचा विविध स्पर्धात, गाण्यात अधिका अधिक सहभाग नोंदविला.संपूर्ण कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी सुप्रियाताई पवार,वैशाली साळुंखे, वसुधा कुंभार, सविता लोखंडे, यांचे सह प्राचार्या नंदिनी गायकवाड व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सह महिलावर्ग उपस्थित होता.
शेवटी प्रत्येक महिलेस छोटीशी भेट व खिरापत देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती कोळेकर, मनीषा पाटील, सोनाली खोत, सुवर्णा जगदाळे, भोईटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 9