पंढरपूर : नवरात्र महोत्सव सांगतेच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक पोषाखासह विविध अलंकार परिधान करण्यात आले आहेत. दरवर्षीच्या प्रथा-परंपरेनुसार मातेचा साजशृंगार करण्यात आला असून, अलंकारांनी सजलेले मातेचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
श्री विठ्ठलास सोन्याचे मुकुट, कौस्तुभ मणी, हिऱ्याचे कंगनजोड, दंडपेट्या जोड, नामनिळाचा, मोठा शिरपेच, लहान शिरपेच, मस्त्य जोड, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, एकदाणि, तुळशीहार, मोत्याचा तुरा, दोन पदरी मोत्याची कंठी, मोठी बोरमाळ, सोन्याचे पैंजण जोड, सोन्याचे तोडे जोड, पितांबर इ. अलंकार परिधान करण्यात आलेली आहेत.
याबरोबरच रुक्मिणी मातेला देखील सोने मुकुट, सरी, कंबरपट्टा,तांबडी चिंचपेटी,तानवड जोड,मोहराची माळ, जवेचे माळ, पुतळ्याची माळ,तोडे जोड, वाक्या जोड, हायकोल,जवमनी पदक,लक्ष्मीहार आदी पारंपरिक अलंकारांनी सजविण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
———-
चौकट : (महालक्ष्मी मातेला)
सोन्याचे गंठण, शिरपेच, तांदळाहार, मोठी एकदाणि, चंद्रहार, कोयरीहार, लक्ष्मी पदकाचे लॉकेट, जवेची माळ, दंडपेट्या, चांदीची छत्री इत्याधी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
———–
चौकट: (श्री व्यंकटेशास)
इमिटेशन नेकलेस, अष्टपैलू मण्याची कंठी, चंद्रहार, मोहनमाळ, लक्ष्मीहार मोठा इत्यादी अलंकार प्रथा परंपरेप्रमाणे परिधान करण्यात आले होते .
Post Views: 10