अक्कलकोट – पवित्र श्रावण मासातील शेवटचा गुरुवार ३ सप्टेंबर रोजी ‘समर्थनगरी प्रतिष्ठान, अक्कलकोट’ यांच्या वतीने अक्कलकोटसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘मौनव्रत उपासना’ आयोजित करण्यात होते. या उपासनेत ४०० हून अधिक भक्ता सहभागी झाले होते . दिवसभर मौनधारणा, चिंतन व उपासनेत हा दिवस साजरा करण्यात आला .
संत, ऋषी-मुनी यांनी विश्वात सुख, शांती व समाधान नांदावे, याकरिता मौनधारणा व उपासनेचा मार्ग अवलंबिला. त्याच आध्यात्मिक परंपरेचे स्मरण करून प्रत्येकाने किमान एक दिवस मौनव्रत धारण करावे आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपली सेवा अर्पण करावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.‘मौनातून आत्मचिंतन, आत्मचिंतनातून आत्मशांती’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपासनेत पहाटे ५ ते रात्री ७ वाजेपर्यंत आहे. वेग वेगळ्या कार्यात व्यस्त अरुणाऱ्या भक्तानी दुपारी ३ ते ७ व सायंकाळी ५ ते ७ अशा वेळेत उपासना पूर्ण केली .
चौकट –
सर्व साधकांच्या नावाची यादी गुरुवार रोजी पहाटे काकड आरती वेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे श्री च्या चरणी अर्पण करून प पु . व्यंकटेश पुजारी व प.पु. नितिन पुजारी यानी संकल्प सोडला.
चौकट = समर्थ नगरीचे आध्यत्मीक कार्य समाधानकारक व आनंददायी आहे . हजारो भक्त नामस्मरण व मौन उपासनेच्या माध्यमातून स्वामी सेवेत सहभागी झाले आहेत . अक्कलकोटहून राज्यात इतके मोठे कार्य केले जाते याचे समाधान आहे . भक्तानी सदैव समर्थ नगरीशी जोडून रहावे . = महेश इंगळे ( चेअरमन – श्री वरवृक्ष स्वामी महाराज देवस्थान )
या उपक्रमासाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोटचे चेअरमन महेश कल्याणराव इंगळे तसेच श्री स्वामी समर्थ समाधी मठ, अक्कलकोटचे श्री वे. शा. सं. अण्णू महाराज यांचे मार्गदर्शन लाभत आहे. नियोजन
संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे , राज्याध्यक्ष अॅड. विश्वास करमरकर , विणाताई कामठे ,वनिताताई झेंडे यांच्यासह पदाधिकारी भक्तनी परिश्रम घेतला.
फोटो – श्री स्वामी समर्थ , मौन साधना करताना