मंगळवेढा – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शासनाने संचमान्यतेच्या निकषांत केलेल्या बदलामुळे हजारो शिक्षकांवर अन्याय होत असताना शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे या अन्यायकारक संचमान्यतेतील जाचक निकषांना विरोध दर्शवण्यासाठी राज्यातील हजारो शिक्षकांच्या वतीने पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले शासनाच्या नवीन निकषांनुसार शिक्षक संघटनांच्या मते,हे निकष कोणत्याही संबंधित घटकांना विश्वासात न घेता शासनाने निकषांमध्ये एकतर्फी बदल केल्याने शिक्षक पदभरतीत कपात होणार असून,याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितावर होणार आहे ४५ मिनिटांऐवजी ४० मिनिटांच्या तासिकेचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे कायम ठेवावा,विज्ञान शाखेतील प्रॅक्टिकल बॅचची विद्यार्थीसंख्या ३० ऐवजी २० ठेवावी,शारीरिक शिक्षण व पर्यावरण विषयांचा कार्यभार विभागल्याने कमी पदे पूर्ववत करावीत,दोन विषयांचा एकत्रित कार्यभार मान्य करून शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी,पूर्णवेळ शिक्षकांसाठी तासिका समायोजन करताना सीएचबी शिक्षकांचा कार्यभार शून्य करू नये,वरिष्ठ महाविद्यालय संलग्न व हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांसाठी संचमान्यतेचे निकष व विद्यार्थी समान ठेवावेत अशा अनेक मागण्याचे निवेदन महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले यावेळी जाचक संचमान्यता निकषांना विरोध दर्शवीत शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली सदर
आंदोलनात यावेळी महासंघाचे विविध पधादिकारी यांचेसह श्री संत दामाजी महाविद्यालयाचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा शैलेंद्र मंगळवेढेकर,प्रा धनाजी गवळी,प्रा उत्तम सुर्यगंध,प्रा धनंजय मेहेर,प्रा गोविंद गायगोपाळ,प्रा दादासाहेब देवकर,प्रा श्रीराम पवार,प्रा संगाप्पा पाटील,प्रा विजय दत्तू,प्रा विनायक कलुबर्मे यांचेसह राज्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,शिक्षक,शिक्षिका मोठया संख्येने उपस्थित होते
Post Views: 15