अक्कलकोट : ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे केदार शिंदे दिग्दर्शित एक अत्यंत लोकप्रिय आणि धम्माल विनोदी मराठी नाटक संपन्न झाले, भरत जाधव एन्टरटेन्मेंट निर्मित मराठी नाटक “श्रीमंत दामोदरपंत” लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे आणि सहकारी यांच्या नाटकाने ख्यातनाम सदरच्या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड गर्दी झाली होती. हे नाटक भन्नाट कथानक: कथानकात दररोज संध्याकाळी ठीक ६ वाजता एका स्वातंत्र्यसैनिकाचा (श्रीमंत दामोदर पंत) आत्मा त्यांच्या नातवाच्या (दामूच्या) शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर घरात होणारी तारांबळ आणि निर्माण होणारा संभ्रम व प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनी ‘दामोदर पंत’ आणि ‘दामू’ या दोन्ही भूमिका अत्यंत सहजसुंदर आणि ऊर्जेने भारलेल्या केल्याने त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे प्रेक्षक वर्गात हश्या पिकला, नाटकातील संवाद अतिशय चटपटीत आणि लक्षात राहण्याजोगे होते. केदार शिंदे यांच्या दिग्दर्शन शैलीमुळे नाटकाची गतिशीलता शेवटपर्यंत टिकून राहिले, परिपूर्ण कौटुंबिक नाटक असून, यात विनोदासोबतच नातेसंबंध, भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचा उत्तम मेळ पाहायला मिळाल्याने प्रेक्षकातून आनंद व्यक्त झाला. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ३९ व वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम २०२६ च्या आयोजनाने अक्कलकोटकर व स्वामी भक्तातून समाधान व्यक्त होत आहे.*
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३९ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शनिवारी भरत जाधव एन्टरटेन्मेंट निर्मित मराठी नाटक “श्रीमंत दामोदरपंत” लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे आणि सहकारी यांच्या नाटकाने कार्यक्रमाचे ७ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन : संपादक मिलिंद कुलकर्णी, डॉ.रोहिणी पाटील, डॉ.शैलेश पाटील, वैभव ढेरे, उमेश येळवे, दुधनी नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, जि.प. सदस्य नेताजी खंडागळे, उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, दत्ता मुळे, सुशील हडदरे, संतोष भोगशेट्टी, माल्लीकाजून पाटील, विकास तरे, ठाणे, संजय कुलकर्णी, सुरज धाये, जावेद पटेल, नगरसेवक रमेश कापसे, शिवसेना नेते संजय देशमुख, दत्तकुमार साखरे, भाऊ घाडगे, यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा व कलाकारांचा भरत जाधव, कमलाकर सातपुते, मनोज टाकणे, मयूर पाटील यांचा सत्कार न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती व प्रतिमा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक, कोरीव प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
चौकट :
*विशेष गौरव :* डॉ.संतोष मेहता, वैद्यकीय यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चौकट :
*गुणीजन गौरव :* नगरसेवक देवीदास कवटगी, मुद्रांक कार्यालय राहूल घाडगे, पोस्ट मास्तर सचिन ज्योतिराम येडके, पत्रकार सतीश पालापुरे, सुनिल विश्वनाथ शिंदे यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट :
*गुणवंत विद्यार्थी गौरव :*
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
या प्रसंगी चप्पळगांव व बावकरवाडी ग्रामस्थाच्या वतीने न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
चौकट :
दि. २६ जुलै रोजी रविवार सायंकाळी ७.१५ ते रात्रौ ९.३० पर्यंत आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडियेला’ खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, अनुयाताई संदीप फुगे, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, संगीता राठोड, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, छाया पवार, सरोजनी मोरे, प्रिया निकम, स्वप्ना माने, तृप्ती बाबर, सुवर्णा घाडगे, कविता भोसले, क्रांती वाकडे, अनिता गडदे, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, हिरकणी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, विश्वस्त- लक्ष्मण पाटील, भाऊ कापसे, लाला राठोड, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, राजाभाऊ निकम, अशोकराव उटगे, मनोज निकम, अरविंद शिंदे, ओंकारेश्वर उटगे, सौरभ मोरे, प्रवीण देशमुख, शीतल फुटाणे, अमोल पाटील, वैभव मोरे, अतिश पवार, प्रवीण घाडगे, निखील पाटील, शिवराज स्वामी, चिदानंद मुस्तारे, विलास राठोड, सिद्धेश्वर मोरे, योगेश कटारे, प्रा.प्रशांत शिंपी, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, सुरेश पाटील, मल्लिनाथ स्वामी, शाम ढवने, अॅड. फहीम पिरजादे, सोनटक्के बंधू, विजय इंगळे, सर्फराज शेख, प्रशांत साठे, मैनुद्दीन कोरबू, अश्पाक काझी, असद फुलारी, रोहित खोबरे, रोहित पाटील, राहुल भंडारे, अप्पा हंचाटे, आकाश शिंदे, रोहन शिर्के, वासू कडबगांवकर, स्वामिनाथ बाबर, प्रा. सायबण्णा जाधव, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, आकाश सूर्यवंशी, किरण पाटील, राजाराम पवार, सुमित कल्याणी, अमर मसरे, शुभम सावंत, यश विभूते, बलभीम पवार, गोविंदराव शिंदे, धनप्पा उमदी, कुमार सलबत्ते, शहाजीबापू यादव, कुमार पाटील, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, मल्लिकार्जुन बिराजदार, आकाश शिंदे, प्रसाद हुल्ले, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, अनिल बिराजदार, श्रीशैल कुंभार, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, निखील शिंदे, अभिषेक चव्हाण, अमित कोळी, लक्ष्मण शिंदे, आकाश सूर्यवंशी, विनायक भोसले, सुमित घाटगे, समर्थ घाटगे, सैद्प्पा इंगळे, भरत राजेगावकर, संतोष माने, बाबू मसुती, किरण साठे, ज्ञानेश्वर भोसले, समर्थ चव्हाण, राहुल इंडे, रमेश हळसंगी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.
चौकट :
*डॉ. रोहिणी पाटील यांचे महिलांचे आरोग्य विषयी मार्गदर्शन संपन्न-*
महिलांच्या आरोग्य विषयी मार्गदर्शनपर बोलताना डॉ. रोहिणी पाटील म्हणाल्या, घरातील सर्वांची काळजी घेणाऱ्या महिला अनेकदा स्वतःच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्या मुळे लवकर आजारी पडतात. महिलांनी आरोग्यासाठी घरात उपलब्ध असणारे पौष्टिक पदार्थ, अळीव, इसबगोल यांसारख्या पारंपरिक आणि आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. वजन नियंत्रण, योग्य पोषण, आणि तणावमुक्त राहण्यासाठी नियमित व्यायाम व चांगल्या सवयी आत्मसात करण्याचा सल्ला यावेळी डॉ.रोहिणी पाटील यांनी उपस्थित महिलांना दिल्या. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष, समतोल आहार, योग्य जीवनशैली बाबत व्यापक भूमिका डॉ. रोहिणी पाटील यांनी प्रश्नोत्तराने मार्गदर्शनपर विचार व्यक्त केल्या. या प्रसंगी प्रश्नांची विचारणा निवेदिका श्वेता हुल्ले यांनी केले. त्यांच्या या मार्गदर्शनाने उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी डॉ.रोहिणी पाटील यांनी महिलांना ५ महत्वाचे मुद्दे सांगितले. यामध्ये महिलांनी १) रोज एक चमचा तूप आणि एक ग्लास गरम पाणी प्यावेत, २)दिवसभरात ३.५० लिटर पाणी प्यावेत, ३) जेवणानंतर आहे तिथे २० मिनिटे चालावेत, ४) रोज जेवणात डाळ, काकडी, गाजर खावेत, ५) नियमित ७.५० तास झोप आवश्यक आहे. असे त्यांनी ५ मुद्दे त्यांनी उपस्थित महिलांना सांगितले.
चौकट :
*शुभ संदेश –*
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट संस्थेतर्फे ३९ वा वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक १९ जुलै ते २९ जुलै, २०२६ या काळात साजरा करण्यात येत आहे, हे कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.
भाविकांसाठी अखंड अन्नछत्र सुरू ठेवून आपल्या संस्थेने निःस्वार्थपणे सामाजिक आणि धार्मिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद या निमित्ताने सर्व भाविकांपर्यंत पोहोचावा ही प्रार्थना. वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यायोगे श्री स्वामी समर्थांचे आध्यात्मिक विचार, भूतदयेचे आणि विश्वकल्याणाचे संस्कार सर्व समाजघटकांमध्ये रुजावेत अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.
धर्मसंकिर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. श्री स्वामी समर्थांच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमस्कार. श्री स्वामी समर्थ…!
प्रा. राम शिंदे
सभापती महाराष्ट्र विधानपरिषद
चौकट :
*अक्कलकोट 10K भक्ती रन-*
आज दि. २६ जुलै रोजी रविवार पहाटे ५.३० ते ९.३० वा पर्यंत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), व चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आरोग्य ते अध्यात्म” हा प्रेरणादायी संदेश देणारी ही “भक्ती रन” स्पर्धा रविवार दि. २६ जुलै २०२६ रोजी अक्कलकोटच्या पावन भूमीत आयोजित करण्यात आली असून, शारीरिक तंदुरुस्ती, अध्यात्मिक उन्नती आणि भक्तीमय वातावरणाचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार आहे. या भव्य “अक्कलकोट 10K भक्ती रन” या आगळ्यावेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Post Views: 7