सांगोला – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सहकार विभागाच्या सरचिटणीसपदी सांगोल्यातील प्रताप मधुकर जांगळे यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात आयोजित सहकार मेळाव्यात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते जांगळे यांनी नियुक्तीपत्र स्वीकारले. याप्रसंगी पक्षाचे प्रभारी डॉ.प्रसाद, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार विभागाच्या प्रदेशाध्यक्ष ऍड.शुभांगी शेरेकर, अनिल ठाकूर, अजयसिंह इंगवले उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील विविध संस्थांशी समन्वय साधत सहकार चळवळीला अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे प्रताप जांगळे यांनी यावेळी सांगितले.