Sunday, May 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नाट्य परिषदेच्या रखडलेल्या सभागृहासाठी ‘खासदार निधी’ द्यावा – सोलापूर शाखेची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
May 31, 2026
in solapur
0
नाट्य परिषदेच्या रखडलेल्या सभागृहासाठी ‘खासदार निधी’ द्यावा – सोलापूर शाखेची मागणी
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
​सोलापूर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सोलापूर शाखेच्या वतीने मोदीखाना येथे उभारण्यात येत असलेल्या हक्काच्या सांस्कृतिक वास्तूचे (सभागृहाचे) अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ३२ लाख १ हजार ९७३ रुपयांचा निधी आपल्या खासदार निधीतून उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही विनंती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि पदाधिकाऱ्यांनी राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, नाट्य परिषदेने जेवढा निधी मागितला आहे, तेवढा निधी राज्याचे मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांच्याकडून मिळवून देण्यासाठी विशेष पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिले.
    ​सोलापूर शहरात संपन्न झालेले ऐतिहासिक ८८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीमुळे आणि भव्य आयोजनामुळे ‘न भूतो न भविष्यती’ असे ठरले होते. या संमेलनाच्या उर्वरित निधीतून आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सहकार्याने मोदीखाना येथे परिषदेची स्वतंत्र इमारत उभी राहिली आहे. मात्र, निधीअभावी या इमारतीचे काम अद्याप अपूर्ण आहे.
​   ​प्रस्तुत आराखड्यानुसार नाट्य परिषदेच्या स्वर्गीय पद्माकर देव या इमारतीमधील खालील महत्त्वपूर्ण कामे निधीअभावी प्रलंबित आहेत ​वरील मजल्यावरील मुख्य सभागृहाचे बांधकाम. ​कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी आवश्यक असणारे फर्निचर. ​हे काम पूर्ण झाल्यास सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील कलावंत आणि तंत्रज्ञांसाठी एक सुसज्ज, हक्काची आणि प्रेरणादायी वास्तू निर्माण होईल, असा विश्वास नाट्य परिषदेने व्यक्त केला आहे. ​नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेने आजवर अनेक रचनात्मक उपक्रम राबवले आहेत. सलग १२ वर्षे ‘सुशील करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून संस्थेने नाट्य चळवळीला नवे बळ दिले आहे. तसेच, गेली २० वर्षे सातत्याने नाट्य कार्यशाळा घेऊन नवोदित कलावंतांना घडवण्याचे कार्य संस्था करत आहे. हे सांस्कृतिक वैभव अधिक समृद्ध करण्यासाठी आता उर्वरित ३२ लाख रुपयांच्या निधीची तातडीने गरज आहे.
    ​खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन सोलापूरच्या कलावंतांचे स्वप्न साकार करावे, अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी ​निवेदन देताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची, अशोक किल्लेदार, प्रमुख कार्यवाह प्रा. ज्योतिबा काटे, नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमामडी पद्माकर कुलकर्णी, राजू रंगम, प्रशांत देशपांडे, राजाराजेशचंद्र, दत्तात्रय बडगंची यांच्यासह नाट्य परिषदेचे इतर मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 9
Previous Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व

Next Post

१५.७२ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजच्या शिंदे फॅमिलीच्या चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

१५.७२ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजच्या शिंदे फॅमिलीच्या चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

आनंदोत्सवात साजरी झाली राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती

May 31, 2026
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

May 31, 2026
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

May 31, 2026

महापालिका शाळांमध्ये सोमवार पासून नव्या पाठ्यपुस्तकांचे बीटनिहाय वाटप

May 31, 2026

खांडवीत वाहनासमोर अचानक आला बिबट्या

May 31, 2026
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांना ४५ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन तभा वृत्तसेवा

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांना ४५ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन तभा वृत्तसेवा

May 31, 2026

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

May 31, 2026
स्कार, शिस्त आणि गुणवत्तेचा वारसा जपणारे मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे

स्कार, शिस्त आणि गुणवत्तेचा वारसा जपणारे मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे

May 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0887769

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697