Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व

तरुण भारतbyतरुण भारत
May 31, 2026
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : “देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असून, पहिल्या टप्प्यात भूमीपुत्र असणाऱ्या हिंदू समाजाला राष्ट्रीय बनवावे लागेल. त्यानंतर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही आम्हाला राष्ट्रीय बनवायचे आहे,” असे प्रतिपादन सामाजिक समरसता गतीविधीचे अखिल भारतीय मंडळ सदस्य रमेश पांडव यांनी केले.
येथील हरिभाई देवकरण प्रशालेत आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप सोहळ्या प्रसंगी रमेश पांडव बोलत होते. व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे विभागीय अध्यक्ष संजीव पाटील, महापौर विनायक कोंड्याल, वर्गाचे सर्वाधिकारी शशिकांत फिरंगे, शहर संघचालक राजेंद्र काटवे आणि वर्ग कार्यवाह प्रशांत सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. प्रारंभी भारतमाता आणि संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
श्री. पांडव म्हणाले, “संघ कोणाचीही मूळ परंपरा किंवा ओळख न बदलता सर्वांना राष्ट्रीय बनवतो. संघात जैन, बौद्ध, कबीरपंथी, महानुभाव, वैदिक सगळे येतात आणि देशहिताचा विचार करतात. संघाच्या शाखेत भगवा झेंडा, शिवरायांचा फोटो असतो; तिथे गाणी, खेळ, भाषणे होतात. शाखेत ‘देशभक्त कार्यकर्ता निर्माणाचे कार्य होते.”
बेसावध अवस्थेतील हिंदू समाजाचे लचके तोडले जात आहेत. म्हणून समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषाने शस्त्राचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. हिंदू समाजाने आता स्वतःचे बलस्थान जागृत करून संघटित झाले पाहिजे, असे मत पांडव यांनी व्यक्त केले.
संजीव पाटील म्हणाले, “संघाला समाज मान्यता व त्यागाची परंपरा लाभली आहे. मन, मनगट आणि मेंदू मजबूत करण्याचे काम या संघ शिक्षा वर्गातून झाले आहे. इथल्या प्रशिक्षणातून घडलेले स्वयंसेवक पुढे शिक्षण, समाजकार्य आणि राजकारणात देशाचे नेतृत्व करतील. चांगला माणूस घडविण्याचे काम संघ करत आहे.” शासकीय सात जिल्ह्यांतील २१३ स्वयंसेवकांनी वर्गात सहभाग घेतला; ज्यामध्ये शेतकरी, व्यावसायिकांसह नोकरदारही होते. समारोप कार्यक्रमात दंड, नियुद्ध, समता, योगासन, घोष यांचे शिस्तबद्ध सादरीकरण स्वयंसेवकांनी केले. १५ मे ते ३० मे या काळात हा वर्ग आयोजित करण्यात आला होता. सोलापूर जिल्हा सहकार्यवाह संजीव सिद्धूल यांनी आभार मानले.
———
चौकट १
रा. स्व. संघाचा आरक्षणाला पाठिंबा
पांडव म्हणाले, “उपेक्षित, वंचित आणि अनुसूचित जाती-जमातींच्या घटकांना समाजजीवनात सहभाग मिळणे आवश्यक होते. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व, या धर्तीवर सर्वांना सहभाग मिळाला आहे. या घटकाला जवळ करून मुख्य प्रवाहात आणले, तर राष्ट्राची प्रगती होते. हा घटक गेली हजार वर्षे पिछाडीला पडला होता. ‘जोपर्यंत आरक्षण घेणारा स्वतःहून आरक्षण नाकारणार नाही, तोपर्यंत आरक्षणाला पाठिंबा असेल,’ असे संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी म्हटले आहे.”
——–
चौकट २
डॉ. आंबेडकरांच्या डोळ्यासमोर हिंदू समाजच होता !
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासोबत ‘हिंदू कोड बिल’ही लिहिले. हे बिल पास करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी अत्यंत आग्रह धरला होता. त्यांचे मित्र किचनेर यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. बाबासाहेबांनी नमूद केले होते की, ‘हिंदू कोड बिल हे या देशाच्या दृष्टीने संविधानापेक्षा १०० पट अधिक महत्त्वाचे आहे.’ म्हणजेच, जो कोणी या समाजात काम करतो, त्याच्या डोळ्यासमोर हिंदू समाजच असतो. संघाने हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र हे शब्द स्वतःचे नाहीत, ते परंपरेतच आहेत; संघ फक्त त्याचे स्पष्टीकरण देतो,” असे रमेश पांडव यांनी सांगितले.
————-
फोटो ओळ –
१) व्यासपीठ –
हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर : समारोप कार्यक्रमात बोलताना रमेश पांडव, यावेळी (डावीकडून) प्रशांत सहस्त्रबुद्धे, महापौर विनायक कोंड्याल, शशिकांत फिरंगे, संजीव पाटील, राजेंद्र काटवे आणि रमेश पांडव.
—
२) प्रात्यक्षिक सादर करताना स्वयंसेवक
Post Views: 22
Previous Post

उमाबाई श्राविका विद्यालयात पदभार हस्तांतरण सोहळा संपन्न!

Next Post

नाट्य परिषदेच्या रखडलेल्या सभागृहासाठी ‘खासदार निधी’ द्यावा – सोलापूर शाखेची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नाट्य परिषदेच्या रखडलेल्या सभागृहासाठी ‘खासदार निधी’ द्यावा – सोलापूर शाखेची मागणी

नाट्य परिषदेच्या रखडलेल्या सभागृहासाठी 'खासदार निधी' द्यावा - सोलापूर शाखेची मागणी

ताज्या बातम्या

तुफान पावसाने दिल्ली विमानतळावर तारांबळ #viral #newsupdate #news

June 8, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारात दिसली अजित दादांची झलक आरोग्य कर्मचाऱ्यांना झापले #maharashtranews

June 8, 2026

कालबाह्य चिवड्याने तरुणास विषबाधा; मंठ्यात संतापाची लाट

June 8, 2026
सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

June 8, 2026

मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये तरुणाचा नशेमुळे बळी #viral #maharashtranews #marathinews

June 8, 2026

लोकमंगल को ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न #solapurnews #marathinews

June 8, 2026

इन्कमटॅक्स मध्ये नोकरीचे आमिष दाखवत सहा जणांना सव्वा पाच लाखांचा गंडा घातला #marathinews

June 8, 2026

पावसाचे पाणी कारखान्यात पडू नये म्हणून तो पत्र्यावर चढला आणि क्षणात जीव गेला #solapurnews

June 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0899542

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697