बार्शी – संतश्रेष्ठ श्री माणकोजी महाराज बोधले हे संत तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेले महान वारकरी संत होते. अखंड हरिनाम, कीर्तनसेवा, भक्ती आणि वैराग्याच्या माध्यमातून त्यांनी धामणगाव भूमीला “धाकटी पंढरी” म्हणून ओळख प्राप्त करुन दिली.
संत माणकोजी महाराजांच्या कीर्तनभक्तीची महती अशी होती की, त्यांच्या चरित्रातील दाखल्यानुसार त्यांच्या कीर्तनसेवेत साक्षात पांडुरंग परमात्मा स्वतः टाळ घेऊन त्यांच्या मागे उभे राहत असत, अशी संतपरंपरेतील श्रद्धा आहे. त्यांच्या संजीवन समाधीच्या वेळीही पांडुरंग परमात्मा धामणगाव येथे उपस्थित राहिल्याची भाविकांची अखंड श्रद्धा आहे.
अशा या पावन संतभूमीत दरवर्षी संजीवन समाधी सोहळा भक्तिभावाने साजरा केला जातो. याच पुण्यप्रसंगी सद्गुरु श्री. प्रभाकरदादा बोधले महाराज (धामणगावकर–पंढरपूर) यांच्या अमृतवाणीतून संतचरित्र, नाममहिमा आणि पांडुरंगभक्तीचा लाभ शुक्रवार दि. ३ जुलै सकाळी १० ते १२ या वेळेत श्रीक्षेत्र धामणगाव (दु.), ता. बार्शी येथे भाविकांना मिळणार आहे.
कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून तरी भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून संतचरणी सेवा अर्पण करावी, अशी विनंती समस्त बोधराज भक्त मंडळातर्फे करण्यात आली आहे.
Post Views: 5