सांगोला – महूद (ता.सांगोला) येथील ग्रामदैवत अंबिकादेवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पूजा देशमुख प्रथम, पूजा रणदिवे व मनस्वी बाजारे विभागून द्वितीय, योगिता कांबळे व प्रियांका खांडेकर यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना पं.स.सदस्य उमेश पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पल्लवी महाजन, मनीषा खबाले, वंदना पाटणे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महूद देवस्थान कमिटीचे कैलास खबाले, दीपक धोकटे, आनंद लवटे, प्रतीक ताटे, रुपेश देशमुख, हर्षवर्धन लवटे, सुनील जाधव, भैय्या पळसे, हिमालय देशपांडे, हर्षल कासार, अजय भोसले, विकास कांबळे, समाधान रेगुडे, महेश ढोणे, गणेश विभुते, अभिजीत काजळे, अनिकेत महाजन, अभिजीत कांबळे, विकी गोटे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 7