Monday, September 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सामाजिक सद्भावातूनच समाजातील प्रश्नांची उकल : स्वानंद कुलकर्णी

तरुण भारतbyतरुण भारत
September 7, 2026
in west maharashtra
0
सामाजिक सद्भावातूनच समाजातील प्रश्नांची उकल : स्वानंद कुलकर्णी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंगळवेढा – समाजातील विविध प्रश्न व समस्या वादातून नव्हे, तर विचारमंथन, संवाद आणि परस्पर समन्वयातून सोडविल्या जाऊ शकतात. सामाजिक सद्भाव हा केवळ विचार नसून तो व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या आचरणातून निर्माण होणारा संस्कार आहे, असे प्रतिपादन स्वानंद कुलकर्णी यांनी केले.
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे रविवार, ६ सप्टेंबर रोजी सामाजिक सद्भाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक सद्भाव, पंचपरिवर्तन, सांस्कृतिक जाणीव, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य या विषयांवर बैठकीत विचारमंथन करण्यात आले.
स्वानंद कुलकर्णी म्हणाले, भारतीय संस्कृतीची ओळख विविधतेतील एकतेत आहे. रामायण, महाभारत आणि भारतीय ज्ञानपरंपरेतून समाजाला एकत्र ठेवणारे अनेक विचार मिळतात. आजच्या पिढीला आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर नेण्याचे प्रयत्न होत असताना तरुणांनी वास्तव समजून घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. समाजातील दोष दूर करण्यासाठी वादापेक्षा संवाद आणि एकत्रीकरणाची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा संयोजक विजय वाघमोडे म्हणाले, मजबूत राष्ट्रनिर्मितीसाठी समाजातील विविध जाती, संस्था आणि घटकांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. यासाठी स्वबोध, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि नागरिक कर्तव्य या पंचपरिवर्तनाच्या पाच सूत्रांवर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातून काम करणे गरजेचे आहे. कुटुंबातील संवाद वाढविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, जातीय भेद दूर करून सामाजिक सलोखा निर्माण करणे तसेच सार्वजनिक जीवनात आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुका संयोजक दिगंबर यादव यांनी प्रास्ताविकात हिंदू धर्माचे विचार व श्रेष्ठत्व, संत-राजांची परंपरा तसेच भक्ती आणि शक्ती परंपरेचे महत्त्व विशद केले. छत्रपती संभाजी महाराज, संत जगनाडे महाराज, संत रविदास महाराज व संत गोरा कुंभार यांचे कार्य तसेच धनगर, गिसाडी, वैदू, नाथ डवरी, रामोशी, मेहतर यांसह विविध समाजघटकांचे योगदान त्यांनी अधोरेखित केले. समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान, स्त्रीचा सन्मान आणि हिंदू समाजातील विविध घटकांचे संघटन यासाठी सामाजिक सद्भावाच्या माध्यमातून कार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान सर्व उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पेरूचे रोप भेट देण्यात आले.
याप्रसंगी एकात्मता मंत्र व सांघिक पद्य ओंकार चिटणीस यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पवार तर आभार दामाजी पडवळे यांनी मानले.
Post Views: 5
Previous Post

सौ.भू.म.पुल्ली कन्या प्रशालेतील १६०० विद्यार्थिनींची मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

Next Post

माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील राजकीय घटकांशी संपर्क वाढविल्याचे चित्र

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील राजकीय घटकांशी संपर्क वाढविल्याचे चित्र

माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील राजकीय घटकांशी संपर्क वाढविल्याचे चित्र

ताज्या बातम्या

सांगोला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

सांगोला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक 

सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक 

September 7, 2026
‘शेतकरी उतरले रस्त्यावर’ राज्यात दुष्काळ जाहीर करून वगळलेले ट्रिगर पुन्हा घ्या -शंकर गायकवाड

‘शेतकरी उतरले रस्त्यावर’ राज्यात दुष्काळ जाहीर करून वगळलेले ट्रिगर पुन्हा घ्या -शंकर गायकवाड

September 7, 2026
शिक्षकांनी ज्ञान, विचार व कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण करावा- नानासाहेब लिगाडे

शिक्षकांनी ज्ञान, विचार व कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण करावा- नानासाहेब लिगाडे

September 7, 2026
चपळगांवच्या रिनाती इंग्लिश स्कूलची  मैदानी स्पर्धेत 6 पदकांची कमाई

चपळगांवच्या रिनाती इंग्लिश स्कूलची  मैदानी स्पर्धेत 6 पदकांची कमाई

September 7, 2026
प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे ११ उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे ११ उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

September 7, 2026
सज्जनांच्या परिपालनाकरता व दुष्टांच्या विनाशाकरीता विविध रुपातून भगवंत अवतार घेतात – ह.भ.प.शाहू महाराज माने

सज्जनांच्या परिपालनाकरता व दुष्टांच्या विनाशाकरीता विविध रुपातून भगवंत अवतार घेतात – ह.भ.प.शाहू महाराज माने

September 7, 2026

अन्नछत्र मंडळ येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा

September 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1171682

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!