सोलापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग, सोलापूर व शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशालेतील सुमारे १६०० विद्यार्थिनींची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ ते शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ या तीन दिवसीय नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केंद्रीय विशेष शिक्षक रुपाली केंची मॅडम यांच्या विशेष प्रयत्नातून यशस्वीपणे संपन्न झाले.
या शिबिरासाठी शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाच्या प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर प्रियांका कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत चव्हाण, तेजस्वी गुरगुले व मोहित पठाण या ऑप्टोमेट्रिस्ट तज्ञांनी विद्यार्थिनींची नेत्र तपासणी केली.
विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमामुळे त्यांच्या डोळ्यांशी संबंधित समस्या वेळीच निदर्शनास आणून त्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले. या उपक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री.तुकाराम श्रीराम व पर्यवेक्षक श्री.परमेश्वर बाबळसुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमासाठी वेळ, सेवा आणि सहकार्य दिल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ. उमा कोटा यांनी शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
या उपक्रमाबद्दल पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम ,उपाध्यक्ष प्रा.श्रीनिवास कोंडी ,सचिव दशरथ गोप ,सहसचिव मलिकार्जुन सरगम ,खजिनदार गोवर्धन कमटम ,शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली व सर्व विश्वस्तांनी कौतुक केले.