सांगोला – सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने पदाधिकारी माजी पोनि.हरी बाबर यांनी जोगेश्वरी पूर्वचे खा.रवींद्र वायकर यांची समक्ष भेट घेऊन सांगोला-पंढरपूर-शेगाव रेल्वे सेवा सुरू करण्याचे व इतर मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनामध्ये ११०२७ आणि ११०२८ दादर-सातारा-दादर रेल्वे दररोज सुरू करण्यात यावी.
सांगोला-पंढरपूर-शेगाव (गजानन महाराज मंदिर) रेल्वे सेवा सुरू करावी त्यामुळे विदर्भातील पंढरी व पश्चिम महाराष्ट्रातील पंढरी याची संयुक्तीता वाढून भावी भक्तांचे सोय होईल अशी मागणी करण्यात आली. दिलेल्या निवेदनावर तत्काळ कार्यवाही करिता रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खा.रवींद्र वायकर यांनी यावेळी दिले.

























