सोलापूर – आजाराला कंटाळून एका सुरक्षारक्षकाने घरातील लाकडी वाशाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दमानी नगर भागात मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.
मनोजसिंग मनासिंग चव्हाण (वय 48 वर्ष, रा लक्ष्मी पेठ, दमानी नगर सोलापूर) असे गळफात घेतलेल्या त्या वॉचमन चे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी मनोज सिंग यांनी घरामध्ये गळफास घेतला असल्याचे निदर्शनास पडले. नातेवाईकांच्या सहाय्याने त्यांना खाली उतरवून येथील शासकीय रुग्णालयात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ए व्ही शेळके यांनी रात्री साडेआठ वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत मनोज सिंग हे मागील काही दिवसापासून आजाराने त्रस्त होते. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी दिली
Post Views: 4