सोलापूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सोलापूर जिल्हा यांची सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेचे अध्यक्ष प्रदेश कार्यध्यक्ष सिद्राम रुद्रार हे होते. यावेळी नाभिक महामंडळाच्या विविध विषयावर चर्चा होवून महामंडळाची व्याप्ती संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात वाढविण्याचे आणि शासन दरबारी नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यावर विचाराची नियम होवून मागण्या मान्य करून घेण्यासाठी नियोजन करण्यात आले.
यावेळी या सभेसाठी माजी प्रदेश कार्यध्यक्ष हिंदूराव गोरे, मार्गदर्शीका संजीवनीताई गोरे, महिला प्रदेश अध्यक्षा डॉ. माधुरी ताई पारपल्लीवार, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश जोगीपेठकर सोलापूर महिला जिल्हा अध्यक्षा अलकाताई ताटे, शोभाताई राऊत, मल्हारी राऊत, भारतीताई हडपद, सुनिता दळवी, उज्वला यादव, राजश्री गवळी, रुक्मिनी भोसले, वैषाली सोनायलू, अर्चना संगमवार, मनिश गंजाळकर, निलकंठ हल्लाळीकर, राजु शुक्लवार, मल्हारी राऊत, राम राऊत, रविंद्र सुर्यवशी महेश श्रीमंगले, गितेंद्र बेनाळकर, मुरली पंदिला, शशिकांत मल्लापुरे, परशुराम श्रीमंगले, लक्ष्मण भालेकर, नागनाथ कोरे, प्रकाश लोखंडे, दत्तात्रय राऊत, अॅड. पवनकुमार शिंदे, विशाल दाके, गणेश घाडगे, अंबादास सुरवसे, यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडी नंतर नुतन सोलापूर जिल्हा कार्यध्यक्ष शेखर कॉडापूरे यांनी निवडीला सत्कारास उत्तर देताना सांगितले की, नाभिक समाजाच्या हितासाठी आणि गरजु बांधवांना प्रामाणिकपणे सहकार्य करण्याचे आणि समाजाशी आणि संघटनेशी एकनिष्ठ राहून प्रामाणिक समाजसेवा करणार असल्याचे सांगितले निवडी नंतर मान्यवराच्या हस्ते सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
या सभेचे सुत्रसंचालन सोलापूर शहर युवक अध्यक्ष मुरली पंदीला यांनी केले तर उपस्थितांचे
आभार सोलापूर शहर संघटक शशीकांत मल्लापुरे यांनी मानले.
Post Views: 9