सोलापूर दि.२३/७/२०२६ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात ठराव मांडून निषेध करण्यात आला*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २२ जुलै रोजी झालेल्या शहर व जिल्हा बैठकीत दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आंदोलन मुले- मुली,महिला यांच्यावर पोलिसांमार्फत झालेला अमानुष हल्ल्याचा संपूर्ण जबाबदार हे केंद्रातील मोदी सरकार आहेत हल्ला पाहता लोकशाही नव्हे तर हुकूमशाही आहे असे दिसून आले या हल्ल्यामध्ये असंख्य विद्यार्थी- विद्यार्थिनींनी गंभीर जखमी झाले आहेत यास पूर्णता जबाबदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत विष्णू कारमपुरी( महाराज) यांनी निषेधाचा ठराव मांडला त्यास उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी एकमुखांनी निषेध नोंदवून ठराव पारित करण्यात आले*
*जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महेश धाराशिवकर, विष्णू कारमपुरी,( महाराज )सुरेश जगताप राजाभाऊ*कुसेकर,शिवा ढोकळे, संदीप बेळमकर, संताजी भोळे, अनिल दंडगुळे, जर्गीस मुल्ला, प्रसाद जगताप,राम वाकसे, तुषार आवताडे, निरंजन बोध्दुल,तुषार खंदारे,दिनेश चव्हाण, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल कुराडकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते