अक्कलकोट – येथील शिवसेनेच्या वतीने एस आय आर आढावा बैठक व अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांचा मेळावा शनिवार ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता येथील मैंदर्गी रोड वरील कांतामाता विजयसिंहराजे भोसले मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली.
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास शिवसेनेचे खासदार ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख धर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थीतत व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 9