Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
November 10, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवारी (ता.९) प्रक्षाळपुजेचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आषाढी व कातिकी यात्रे नंतर परंपरे नुसार प्रक्षाळपुजेचा उत्सव विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. त्यानुसार लिंबु साखर लावून केशरयुक्त पाण्याच्या स्नाना नंतर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेस खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. या बरोबरच यात्रेच्या काळात भक्तांना चोविसतास दर्शन देवून थकलेल्या विठ्ठलाचा थकवा किंवा शिनवटा जावा म्हणून परंपरे नुसार विठुरायाला रात्री गवती चहासह विविध प्रकारचे पंधरा ते सोळा पदार्थ घालून खास बनविण्यात आलेला काढा देखील रात्रीच्या वेळी दाखविण्यात आला.

आषाढी व कातिकी यात्रांच्या वेळी येथे लाखोंच्या संख्येने भक्त येत असतात. येथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला विठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी विठुराय हे रात्रदिवस अखंडपणे उभे असतात. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, दुपारी साडेपाच वाजता दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धुपआरती, रात्री शेजारती असे रोजोपचार बंद असतात. फक्त दैनंदिन काही नित्योपचार मात्र सुरु असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंग देखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देवुन विठ्ठलाला देखील थकवा आलेला असतो.

विठ्ठलाला आलेला थकवा किंवा शिनवटा काढण्यासाठीच आषाढी व कार्तिकी यात्रे नंतर एक चांगला (शुभ) दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळपुजेचा उत्सव साजरा करण्यात येत असतो अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. त्यानुसार रविवारी (ता.९) प्रक्षाळपुजे निमित्त मंदिराची स्वच्छता करण्यात आली. विठ्ठलाला लिंबु साखर लावून  केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालून मंदिर समितीच्या वतीने मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

त्या नंतर सायंकाळी देवाला आकर्षक पोशाख परिधान करुन पारंपारिक अशा विविध दुर्मिळ सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. सायंकाळच्या वेळी नेहमी प्रमाणे धुपाआरतीचा कार्यक्रम झाला. या अगोदर यात्रेमुळे काढण्यात आलेला विठ्ठलाचा पलंग देखील शयनघरात पुर्ववत लावण्यात आला. यात्रेच्या कालावधीत दिवसरात्र भक्तांना दर्शन देवून थकलेल्या विठुरायाचा शिनवटा नाहिसा व्हावा यासाठी त्याला रात्रीच्या वेळी गवतीचहासह अन्य विविध पदार्थां पासून बनविलेल्या असा खास आयुर्वेदिक काढा देखील दाखविण्यात आला.
———————

आयुर्वेदिक काढ्यात विविध पदार्थांचा समावेश –
विठ्ठलाचा थकवा दूर व्हावा यासाठी त्याला खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवतीचहाची पाने, गुळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजु, बदामबी, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थां पासून खास काढा बनविण्यात येत असतो. हा काढा रात्रीच्या वेळी विठ्ठलाला दाखविण्यात येतो. भक्तांना यात्राकाळात चोविसतास दर्शन देवून विठ्ठलाला आलेला शिनवाटा किंवा थकवा या काढ्यामुळे दूर होतो अशी या मागची भावना असल्याचे सांगितले जाते.
——————-

निगडे आणि नडगिरे यांच्या हस्ते पुजा संपन्न –
श्री विठ्ठलाची व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा रविवारी मुहूर्तानुसार अनुक्रमे मंदिर समिती सदस्या ॲड.माधवी निगडे  व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते संपन्न झाली.
——————–

देवाचे नित्योपचार आणि राजोपचारास प्रारंभ –
दरम्यान प्रक्षाळपुजे पासून श्री विठ्ठलास व श्री रूक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इत्यादी राजोपचार सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके  यांनी दिली.

विठ्ठल रुक्मिणीस पारंपारिक दागिने परिधान –
प्रक्षाळपुजे निमित्त श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी २ पदरी, मोत्याची कंठी १ पदरी पदकास मोती, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, मस्त्य जोड, लक्ष्मी पदकासह लॉकेट, तुळशीच माळ १ पदरी, शिरपेच लहान १० लोलक असलेला, शिरपेच मोठा २ लोलक असलेला, तोडे जोड, जवेची माळ २ पदरी, एकदाणी इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत. या बरोबरच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्य जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमानी पदक, लक्ष्मीहार, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
——————–
फोटोआळी : पंढरपूर : प्रक्षाळपुजे नंतर रविवारी विठ्ठल रुक्मिणी मातेला आकर्षक वस्त्रे परिधान करुन पारंपारिक अशा विविध प्रकारच्या सोन्याच्या दुर्मिळ अलंकारांनी सजविण्यात आले होते.

Post Views: 69
Previous Post

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी यमुना चव्हाण

Next Post

ॲड अजिंक्य संगितराव सह पाच जणांविरुद्ध पोस्को, ॲट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ॲड अजिंक्य संगितराव सह पाच जणांविरुद्ध पोस्को, ॲट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

‘तरुण भारत ‘च्या पुणे आवृत्तीचे लोकार्पण

April 18, 2026

अक्षय तृतीया संकल्पनातून आत्मसमृद्धीकडे नेणारा दानाचा दिव्य मार्ग – मुनिश्री

April 18, 2026

जुळे सोलापूर ब्रह्म बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने परशुराम पूजन आयोजन

April 18, 2026

हमीभावाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी ; सोयगाव

April 18, 2026

सीबीएसई बोर्ड परीक्षेमध्ये निरज पाटील प्रथम

April 18, 2026

सोलापूरच्या रणरागिणींची विजयी घोडदौड ; कोल्हापूर आणि पुण्यावर दिमाखदार विजय

April 18, 2026

कर्णधार संदेश गाडेचे शानदार शतक; श्रवण माळी ‘ मॅन ऑफ द मॅच ‘

April 18, 2026

दोन्ही आ. देशमुख करत आहेत करवाढीला विरोध

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0816999

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697