Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हत्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून निवडणूक विजयाचा साधेपणाने आनंदोत्सव

तरुण भारतbyतरुण भारत
May 5, 2026
in editor
0
हत्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून निवडणूक विजयाचा साधेपणाने आनंदोत्सव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे झालेली निष्पाप बालिकेची हत्या आणि सोलापूर शहर जिल्ह्यात विविध घटनांमध्ये झालेल्या खूनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने सोमवारी पश्चिम बंगाल, आसामसह विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशाचा आनंद अत्यंत साधेपणाने साजरा केला.

भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यालयासमोर भाजपाचा ध्वज फडकावून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, पश्चिम बंगालची जनता संकटाच्या कचाट्यातून सुटली आहे. भाजपाचा विजय म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. संपूर्ण देशात भाजपाची सत्ता यावी हे शामाप्रसाद मुखर्जींचे स्वप्न साकार करण्याकडे भाजपची वाटचाल होत आहे. नसरापूर येथील निष्पाप बालिकेच्या हत्येची तसेच शहर जिल्ह्यात झालेल्या सहा हत्यांच्या प्रकरणाची जाणीव ठेवून भारतीय जनता पार्टीने ढोल, ताशे, मिठाई अशा स्वरूपाचा आनंदोत्सव न करता अत्यंत साधेपणाने एकमेकांना अभिनंदन करून आनंद साजरा केला आहे.

महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, भारतातील जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे. याचे प्रत्यंतर या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने पुन्हा एकदा आलेले आहे. भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार विकासाच्या शिखरावर नेईल, असा विश्वास सर्व जनतेला आहे. हाच विश्वास या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झाला आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल याप्रसंगी म्हणाले.

यावेळी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, रामचंद्र जन्नू, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना  यन्नम, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, भाजपाचे सरचिटणीस डॉ. शिवराज सरतापे, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, महेश देवकर, शहर चिटणीस रवी भवानी, बजरंग कुलकर्णी, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेवक प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, राजकुमार पाटील, भरतसिंग बडूरवाले, बिज्जू प्रधाने, समाधान आवळे, सात्विक बडवे, रवी कैय्यावाले, ऋषिकेश मेट्रे, मेघनाथ येमुल, नागनाथ कासलोलकर, संगीता जाधव, श्रीदेवी फुलारे, मंदाकिनी तोडकरी, विजया वड्डेपल्ली, दीपिका यलदंडी, सत्यनारायण गुर्रम, गौतम कसबे, रुद्रेश बोरामणी, जाकीर सगरी, शिरीष गायकवाड, विजय महिंद्रकर, राजश्री दोडमणी, श्वेता खरात, मृण्मयी गवळी, बसवराज केंगनाळकर, जकप्पा कांबळे, कविता गज्जम, सतीश महाले, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष राजू हिबारे, अल्पसंख्यांक महामंत्री आदम शेख, व्यापारी आघाडी अध्यक्ष लक्ष्मीकांत खंडेलवाल, विश्वनाथ प्याटी, विजय धोत्रे, ओंकार होमकर आदी उपस्थित होते.

———

मृतांना वाहिली श्रद्धांजली

नसरापूर येथील बळी पडलेल्या निष्पाप बालिकेला तसेच शहर जिल्ह्यात झालेल्या खुनांच्या घटनातील मृतांना यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक मिनिट मौन राहून श्रद्धांजली वाहिली.

Post Views: 7
Previous Post

सोलापूरच्या नातीला न्याय मिळण्यासाठी कॅन्डल मार्च… तर अशा घाणेरड्या वृत्ती ठेचून काढण्यासाठी अधिकार द्या

Next Post

कौतुकास्पद यश!  शुभांगीचा ‘एकता महिला मंच’कडून गौरव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कौतुकास्पद यश!  शुभांगीचा ‘एकता महिला मंच’कडून गौरव

कौतुकास्पद यश!  शुभांगीचा 'एकता महिला मंच'कडून गौरव

ताज्या बातम्या

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

May 5, 2026
गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

May 5, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

May 5, 2026
रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

May 5, 2026
चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

May 5, 2026
ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

May 5, 2026
अनिल पाटील यांच्या साहित्यकृतीचा पुण्यात ‘तितिक्षा’तर्फे गौरव

अनिल पाटील यांच्या साहित्यकृतीचा पुण्यात ‘तितिक्षा’तर्फे गौरव

May 5, 2026
सीईओ’ कुशल जैन यांची वसतीगृहांना अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून

सीईओ’ कुशल जैन यांची वसतीगृहांना अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0846821

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697