
सोलापूर: एल. एक्स. टी. पुणे यांच्या वतीने कासारसाई, पुणे येथे २४ मे २०२६ रोजी २५ वी एल. एक्स. टी. स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप २०२६ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सोलापूर येथील विनर्स फाउंडेशन स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत दुसऱ्या क्रमांकाच्या जनरल चॅम्पियनशिपवर (उपविजेतेपद) आपले नाव कोरले. या स्पर्धेत सोलापूरच्या खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उज्वल कामगिरी करून १३ पदकांची कमाई केली. या सर्व खेळाडूंना स्पर्धेचे आयोजक रितू राणे यांच्या हस्ते पदके बहाल करण्यात आली.
या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्यांमध्ये विराज आरकाल, असीत कांबळे, आरोही गाडे यांचा समावेश आहे. रजत पदक असद शेख, आराध्या बडवणे, सक्षम हुच्चे, देवांश सरवदे, शौर्य कदम, सारंग मठपती यांनी पटकावले, तर मेदिनी जगताप, साद शेख, विनायक हुच्चे, सोहम गाडे यांनी कांस्य पदक मिळवले. याशिवाय याह्या शेख, लास्या शेरला व समर्थ औरंगे या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आपल्या कौशल्याने सर्वांची मने जिंकली.
या सर्व विजेत्या व सहभागी खेळाडूंना सोलापूर जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी प्रकाश मोहार, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड, दयानंद महाविद्यालयाचे प्रशासक विजयकुमार उबाळे यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. खेळाडूंच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक सम्यक मोहोळकर, सागर राठोड, सिद्धू सुतार आणि वासूदेव कैरमकोंडा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
















