Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वारकऱ्यांच्या आरोग्याची यंदा विशेष काळजी”; आषाढी वारीपूर्वी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

तरुण भारतbyतरुण भारत
May 22, 2026
in soalpur
0
वारकऱ्यांच्या आरोग्याची यंदा विशेष काळजी”; आषाढी वारीपूर्वी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –   आगामी आषाढी वारी लक्षात घेता लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने व्यापक पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात दि. २१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या आषाढी वारी पूर्वतयारी नियोजन बैठकीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

      यावेळी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी “वारकऱ्यांची सेवा हीच खरी सेवा असून, प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करून वारी यशस्वी करावी,” असे सांगत आरोग्य विभागाने कोणतीही ढिलाई न करता जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश दिले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

         दरम्यान, वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि वारी सुरक्षित, सुव्यवस्थित पार पडावी यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. यंदाच्या वारीत वाढते तापमान आणि साथीच्या आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. वारकरी दिंड्यांच्या मार्गावर आणि मुक्काम स्थळांवर उष्माघात टाळण्यासाठी ओ.आर.एस.चे मोफत वाटप करण्यात येणार असून, वारकऱ्यांमध्ये आरोग्य जनजागृतीही केली जाणार आहे.

       वारी मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. विहिरी, टँकर, पाणीपुरवठा केंद्रे आणि मुक्काम स्थळांवरील सर्व पाण्याचे स्रोत नियमित तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दूषित पाण्यामुळे होणारे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

      दरम्यान, वारी काळात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी २४ तास उपस्थित राहतील याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वारकऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून आवश्यक तेथे तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

कोट

वारी मार्ग व मुक्काम स्थळांवरील स्वच्छतेवर विशेष भर देत ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून साफसफाई, निर्जंतुकीकरण व कचरा व्यवस्थापन मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच सर्पदंश, अतिसार, ताप आणि इतर साथीच्या आजारांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

– इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर

Post Views: 59
Previous Post

तरुण भारत चॅनलच्या अश्विनी तडवळकर यांच्यासह कर्तृत्ववानांचा होणार सन्मान

Next Post

वाळूजच्या सुपुत्राची यशस्वी भरारी; सनील धनवे PSI वरून API पदावर पदोन्नती 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वाळूजच्या सुपुत्राची यशस्वी भरारी; सनील धनवे PSI वरून API पदावर पदोन्नती 

ताज्या बातम्या

बदलापुरात नगरसेवकावरच हल्ला #viral #news

September 5, 2026

जिल्हाधिकाऱ्यांनी काढला थेट या गोष्टीचा आदेश #solapurnews #viral

September 5, 2026

अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी पार्क चौकातील अतिक्रमण करणाऱ्या गाड्यांना इशारा #viral #solapurnews

September 5, 2026

आमदार पडळकर आणि मराठा आंदोलक आमने सामने #viral #marathinews

September 5, 2026

बापूजी नगरातील वादग्रस्त समाजमंदिर महापालिकेने घेतले ताब्यात

September 5, 2026

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी केली मार्गांची पाहणी #solapurnews #news

September 5, 2026

श्रावण शुक्रवार निमित्त विठ्ठल रुक्मिणीस सुवर्ण अलंकारांनी नटविले #viral #marathinews #news

September 5, 2026

वालचंद कॉलेज समोरचे अतिक्रमण हटवले

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1165438

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!