Friday, May 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तरुण भारत चॅनलच्या अश्विनी तडवळकर यांच्यासह कर्तृत्ववानांचा होणार सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
May 22, 2026
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापुरात शनिवारी नाभिक समाज वधू-वर मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा
तरुण भारत चॅनलच्या अश्विनी तडवळकर यांच्यासह
कर्तृत्ववानांचा होणार सन्मान
सोलापूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, शाखा सोलापूरच्या वतीने  शनिवार दि. २३ मे २०२६ रोजी सोलापूरातील अॅचिव्हर्स हॉल येथे नाभिक समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष वैभव शेटे आणि जिल्हाध्यक्ष संजय चिकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          सकाळी ११ वाजता होणाऱ्या वधू-वर पालक परिचय मेळाव्यात नाभिक समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींच्या पालकांना एकत्र आणण्याबरोबरच ‘शिवयोग’ वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रणिती शिंदे उपस्थित राहणार असून विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
        यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. तरुण भारत चॅनलच्या अश्विनी तडवळकर यांना कला गौरव पुरस्कार, आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना ‘शिक्षक-मित्र’, प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांना ‘शिक्षक भूषण’, तर संजय चिकले जीवन गौरव पुरस्कार, बापूराव चव्हाण -राज्यस्तरीय ज्ञानज्योती गौरव पुरस्कार,  राम डिंगे – समाज भूषण, सुरेश शिंदे – जीवन गौरव पुरस्कार, किरण भांगे , शिवशरण सुरवसे आणि सुदर्शन विभुते यांना समाज रत्न या विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कारार्थींना शाल, फेटा व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
         सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात समाजातील दोन विवाह संपन्न होणार असून नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात येणार आहे. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद देणार आहेत.हा कार्यक्रश्री स्वकुळसाळी समाजातर्फे
वधू-वर पालक परिचय मेळावाम यशस्वी करण्यासाठी महामंडळाचे पदाधिकारी, युवक संघटना, जिल्हा व शहर पदाधिकारी तसेच समाजबांधव परिश्रम घेत आहेत.
        या पत्रकार परिषदेस श्रीकांत राऊत, आनंद वाघमारे, बापूराव काळे, संदीप पवार, मनोज डिगे, सहदेव वाघमारे, प्रदीप मोरे , संजय चिकले आदी उपस्थित होते.
==================
श्री स्वकुळसाळी समाज
वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
सोलापूर : श्री स्वकुळसाळी समाज सोलापूर ज्ञातीचे विठ्ठल मंदिर, बेगम पेठ यांच्यावतीने रविवार दि. 31 मे रोजी सकाळी 10 वाजता अक्कलकोट रोड येथील श्री महालक्ष्मी बँक्वेट, एमआयडीसी, सोलापूर येथे भव्य देशपातळीवरील वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष परमेश्वर गदगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         मेळाव्याच्या उद्घाटनासाठी उद्योगपती उदयकुमार दुधाणे उपस्थित राहणार असून, कौटुंबिक समुपदेशक सोनाली कोदे-वाई यांचे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. “लग्नानंतर सुखी संसार कसा टिकवावा, मतभेद कसे हाताळावेत आणि एकमेकांना समजून घेण्याची गरज काय,” यावर त्या मार्गदर्शन करणार आहेत.
          या मेळाव्यात युवक-युवती आणि पालकांना समोरासमोर संवाद साधण्याची संधी मिळणार असून, कौटुंबिक पार्श्वभूमी, स्वभाव आणि विचार जाणून घेणे अधिक सोपे होणार आहे. मेळाव्यासाठी आतापर्यंत ५०० विवाहयोग्य उमेदवारांनी नोंदणी केली आहे. सहभागींपैकी सुमारे ६० टक्के उमेदवार शहरी, तर ४० टक्के ग्रामीण व निमशहरी भागातील असल्याने सामाजिक व सांस्कृतिक समन्वयाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
ग्रामीण भागातील पालकांची अडचण लक्षात घेऊन ऑफलाईन नोंदणी केंद्रांची सुविधा देण्यात आली असून, तरुणांसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे बायोडाटा व फोटो अपलोडची व्यवस्था करण्यात आली आहे.
घटस्फोटीत, विधूर-विधवा तसेच दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्विवाहासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्यात आले असून, त्यांच्या नोंदणीसाठी विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
या मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष परमेश्वर गदगे व वधू-वर परिचय मेळावा समितीचे मोहन काजळे यांनी केले आहे.
           या पत्रकार परिषदेस ॲड. ज्ञानेश्वर डिंगणे, अंबरनाथ सरवदे , ज्ञानेश्वर एडके, आनंद कोंगे, यशवंत एकबोटे ,अमरनाथ सपात आदी उपस्थित होते
=====
Post Views: 5
Previous Post

शाळा सुरू… पण पुस्तकांची अजूनही प्रतीक्षा”; जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांची उणीव  

Next Post

वारकऱ्यांच्या आरोग्याची यंदा विशेष काळजी”; आषाढी वारीपूर्वी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वारकऱ्यांच्या आरोग्याची यंदा विशेष काळजी”; आषाढी वारीपूर्वी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

वारकऱ्यांच्या आरोग्याची यंदा विशेष काळजी”; आषाढी वारीपूर्वी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

ताज्या बातम्या

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला विनयभंग

May 22, 2026

माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून पत्नीला ठेवले उपाशी

May 22, 2026

इंधनदरवाढ आणि वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर “मोफत बैलगाडी प्रवास” प्रतिकात्मक आंदोलन

May 22, 2026
श्री साई श्रद्धा संस्थेत आंबा महोत्सव उत्साहात संपन्न

श्री साई श्रद्धा संस्थेत आंबा महोत्सव उत्साहात संपन्न

May 22, 2026
लाडकी बहीण योजनेस स्व. अजितदादा यांचे नाव द्या

लाडकी बहीण योजनेस स्व. अजितदादा यांचे नाव द्या

May 22, 2026
युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही!

युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही!

May 22, 2026
जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न

जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न

May 22, 2026
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी घेतली सोलापूर जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी घेतली सोलापूर जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

May 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0874978

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697