सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरअंतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या महिला संघाने उपविजेतेपद पटकावले. तर पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले.
महिला संघाने पंढरपूरच्या स्वेरी अभियांत्रिकीस व सांगोला महाविद्यालयाच्या संघांना पराभूत करत उपविजेतेपदावर नाव कोरले. तर पुरुष संघाने मंगळवेढ्याच्या दलितमित्र कदम गुरूजी सायन्स कॉलेजच्या संघाला नमवत घोडदौड केली. तर संगमेश्वर महाविद्यालयासोबतचा सामना बरोबरीत राहिला.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. एस. एस. तोरवी यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. डॉ. बी. एस. कोरे, प्रा. डॉ . संगमेश्वर निंबर्गी यांनी काम पाहिले. विजेत्या खेळाडूंचे सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष पी. एल. कोळी, उपाध्यक्ष डॉ. सी. जी. हविनाळे, अॅड. संदेश कोळी, सचिव एम. डी. कमळे, सहसचिव प्रा. सुबोध कोळी, खजिनदार प्रा. व्ही. के. पाटील, विश्वस्त नागेश बिराजदार व प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
—–





















