अक्कलकोट – आगामी श्री गणेशोत्सव-2026 शांततेत, उत्साहात व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून साजरा व्हावा, यासाठी विभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग यांच्या वतीने प्रियदर्शनी सांस्कृंतिक भवन कमलाराजे चौक, अक्कलकोट येथे गणेश मंडळांचे पदाधिकारी व शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली .
सदर बैठकीस मा. श्री. विजय कबाडे
गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी व लेझर लाईट ला सक्त मनाई आहे .नो डिजे नो डॉल्बी उपक्रमाला सहकार्य करावे .
पारंपरिक वाद्यांसह भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावे समाज प्रबोधन व समाज एकत्रित ठेवण्याच्या उपक्रमाचे आजही गरज असल्याचे प्रतिपादन
, अपर पोलीस अधीक्षक, विजय कबाडे यांनी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता कमिटी ची बैठक प्रसंगी केले .
याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्र्वस्त अमोलराजे भोसले दुधनी नपाचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे मैंदर्गी चे बाजारमठ , नन्ना मॅडम , तहसिलदार विनायक मगर अक्कलकोट विभाग विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे , पोनि अविनाश पवार पोनि विनोद घुगे वळसंग पोलीस स्टेशनचे पोनि राहुल डोंगरे , . अक्कलकोट नगरपरिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग विदयुत वितरण चे अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
बैठकीमध्ये गणेशोत्सवासाठी आवश्यक परवानग्या वेळेत घेणे, मंडपामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, आक्षेपार्ह देखावे, बॅनर अथवा सामाजिक तेढ निर्माण करणारे साहित्य प्रदर्शित न करणे, तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हिडिओ अथवा संदेश प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या “No DJ, No Dolby” या उपक्रमाच्या अनुषंगाने श्री गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान DJ/Dolbyचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. सार्वजनिक जबाबदारीचे भान ठेवून ध्वनिप्रदूषण टाळत शांततामय, भक्तिमय व आनंददायी वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
गणेश मंडळांनी गणेशमूर्ती व मंडपाच्या सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे बसवावेत, तसेच गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी मंडळातील सदस्यांची दिवस-रात्र 24 तास नियोजनबद्ध पद्धतीने नियुक्ती करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्तीने वर्गणी अथवा देणगीची मागणी करू नये. गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण, शालेय स्पर्धा, आरोग्य शिबिरे व इतर सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कायदेशीर नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन जातीय व धार्मिक सलोखा निर्माण होईल, अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारची अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या बाबींना थारा न देता शांतता व सुव्यवस्था राखावी, तसेच पोलिस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपस्थित गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांना करण्यात आले.
याप्रसंगी दिलीप सिध्दे अशपलक बळोरगी ‘ अविनाश मडीखांबे ‘ संजय देशमुख ,अलताफ पटेल चंद्रशेखर मडीखांबे आदिनी रुद्रय्या स्वामी गणेश मंडळाचे पदाधिकारी मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी नगरसेवक महेश हिंडोळे यशवंत धोंगडे सद्दाम शेरीकर तम्मा शेळके गणेश मंडळ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
Post Views: 25