पिलीव – भारतात महाराष्ट्र राज्य हे साखर उत्पादनात अग्रेसर आहे .कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन घेतले जाते .तसेच इतर राज्याच्या तुलनेत ऊस उत्पादक साखर कारखाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहेत.गतवर्षीचया गळीत हंगामात कारखान्यानी शेतकऱ्यांना गाळपास आलेल्या ऊसास सरासरी 3000 रुपये टन एवढा दर दिला .त्यावेळी बाजारात साखर 38 रुपये किलो होती .पण ह्यावर्षीचा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी बाजारात साखरेचा दर 75 रुपयांपर्यंत पोहचला आहे .खरेतर अनेक साखर कारखान्यानी साखर अद्यापपर्यंत आपल्या गोडावुन मध्ये साठवुन ठेवली आहे .सध्या कारखाने गडबडीने टेंडर काढीत आहेत. ते टेंडर 6000 ते 7000 रुपयांपर्यंत गेले आहे .याचा साखर कारखानदार यांना प्रचंड फायदा होत आहे.पण ज्या शेतकऱ्यांना ऊस लागवडीपासून जर खर्च काढला अगदी मशागत, बेणे, खते, तणनाशक, व इतर औषधे या सगळ्यांचा जर विचार केला तर शेतकऱ्याना अजिबात परवडत नाही तरीही कारखानदार शेतकऱ्यांचा कसलाही विचार करीत नाहीत. बाजारात साखरेला सध्या उच्चांकी दर मिळत आहे.मग शासन व कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यामधील वाटा अगदी 200 ते 300 रुपये टन असा तरी देणार का असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकरीवर्गातुन विचारला जात आहे .केंद्र शासनाच्या माहितीनुसार या क्षेत्रातून पुढील तिन महीन्यात 20 ते 22 हजार कोटींचा फायदा अपेक्षित आहे .मग यातील फायद्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे का ? त्यातूनच शेतकऱ्यांना 200 ते 300 रुपयांपर्यंत पैसे द्यायला कोणत्याच कारखान्याला कसलीच अडचण येणार नाही .साखर कारखानदारांना अच्छे दिन आलेत पण खरा ऊस उत्पादकाला कधी अच्छे दिन येणार. महाराष्ट्रात तर दरवर्षी गळीत हंगाम सुरु करण्यापुर्वी ऊस दरासाठी आंदोलन करावे लागते हे अतिशय दुर्दैवी आहे .साखरेचा दर 60 रुपयांपर्यंत स्थिर राहु शकतो त्यामुळे चालु गळीत हंगामात शेतकऱ्यांना पहीला हप्ता 4000 रुपये देण्यास काहीच अडचण नाही अशी परिस्थिती आहे.त्यातच यंदा अनेक भागात पावसाळा संपत आला तरीही म्हणावा असा समाधानकारक पाऊस अद्यापपर्यंत पडलाच नाही .साखर माञ प्रचंड गोड झाली माञ ती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे जिवन माञ कडु कडु होत चालले आहे . चौकट _ बाजारात सध्या साखरेला उच्चांकी दर मिळत आहे यामुळे ऊसाला पहीला हप्ता 4000 रुपये प्रती टन मिळावा _ सुयश पाटील, ऊस उत्पादक शेतकरी ,कुसमोड. चौकट _ बाजारात सध्या वरचेवर साखरेचा दर वाढत चालला आहे .पण आठवडाभरात साखरेचा दर 60 रुपयांपर्यंत स्थिर राहील _ सुरज खलीपे ,स्वप्नील किराणा स्टोअर्स, पिलीव.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















