शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जपणूक आणि समाजाभिमुख शैक्षणिक उपक्रमांतील योगदानाची दखल घेत डॉ. भाग्यश्री राठोड यांना प्रतिष्ठेचा “ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
या पुरस्कारामुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. पुरस्कार स्वीकारताना डॉ. राठोड यांनी हा सन्मान आपल्या सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि कुटुंबीय यांच्या सहकार्याचे फलित असल्याची भावना व्यक्त केली.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक, विद्यार्थी व शुभचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या सर्वांच्या प्रेम, आशीर्वाद आणि सदिच्छांबद्दल डॉ. भाग्यश्री राठोड यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यापुढेही विद्यार्थीकेंद्रित, मूल्याधिष्ठित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Post Views: 14