बार्शी – माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणेच्या विश्वस्त व महासचिव तसेच एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, सोलापूरच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड-चाटे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयटी व्हीजीएस शाळेच्यावतीने विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले. शिक्षण, संस्कार आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांती प्रार्थना, शाळेचे गीत, प्रतिज्ञा, दिनविशेष, सुविचार आणि महामृत्युंजय मंत्राने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रा. स्वाती कराड-चाटे मॅडम यांच्याप्रती मनोगत व्यक्त करुन त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला.
वाढदिवसाचे औचित्य साधून बार्शी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगरपरिषद शाळा क्रमांक १० मधील विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांसोबत आनंद वाटून घेण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.
तसेच नगरपरिषद शाळा क्रमांक १० येथील मुख्याध्यापक उमाप व नगरपालिका शिक्षण मंडळ शिक्षण पर्यवेक्षक अमोल नलवडे यांच्यावतीने एमआयटी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, बार्शीचे प्राचार्य डॉ. सचिन चव्हाण, शाळेच्या प्राचार्या रेखा पाटील, प्रशासकीय अधिकारी संतोष मिसाळ, वरिष्ठ समन्वयक ओंकार कापसे, प्रा. अनिकेत कारंडे या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. सचिन चव्हाण यांनी प्रा. स्वाती कराड-चाटे मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या शिक्षण व सामाजिक कार्याचे कौतुक केले.