सोलापूर – संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र विधान सभा अंदाज मंडळ समिती चे अध्यक्ष अर्जुन खोतकर याना शासकीय विश्रामगृहात भेटून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत व विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलावातील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या कामाची चौकशी समिती नेमून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ याबाबत कारवाई होईल असे आश्वासन दिले. सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, प्रधानसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त मुंबई यांचेकडे ईमेल द्वारे सादर करण्यात आले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, शहर उपाध्यक्ष सिताराम बाबर, बंटी गायकवाड, प्रकाश व्यवहारे, हनुमंत पवार अदि ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.























