
पंढरपूर – येथील तानाजी किसन मोळक यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या मोडी मजकुराचे मराठी, इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्यासमितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी मोळक यांनी जानेवारी २०२६ मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये ९१ टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले होते. याआधी त्यांनी पुराभिलेख विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत घेतलेल्या मोडी परीक्षेमध्येही यश मिळविले होते.
राज्य शासनातर्फे मंत्रीमंडळ उपसमितीची सप्टेंबर २०२५ च्या बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने मोडी मजकुराचे मराठी, इंग्रजी भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी विस्तृती समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यातआले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने ८ मे २०२६ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशासकीय कायदेविषयक महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी इत्यादी अभिलेखांच्या व कागदपत्रांच्या मोडी मजकुराच्या मराठी, इंग्रजी विषयामध्ये भाषांतर करण्यासाठी मोडी अभ्यासकांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती प्रशासकीय कायदेविषयक वअभियांत्रिकी शैक्षणिक अभिलेखांच्या कागदपत्रांचे मोडी लिपीतील भाषांतर करण्यासाठीभविष्यात काम करेल, असे शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पंढरपुरातून तानाजी मोळक यांची नियुक्ती करण्यात आली असून मोळक यांनी पंढरपूर परिसरात मोडीलिपी दुर्लक्षीत असूनही त्यामध्ये सातत्याने प्रयत्न करून मिळविलेले यश व त्यानंतरराज्य शासनाच्या समितीवर झालेली निवड याबद्दल पंढरपूर परिसरातून त्यांचे कौतूक होतआहे.
Post Views: 15