बार्शी – त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाई महिला मंडळ व प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांचे पूजन पुष्पाने, दीपाने व धुपाने करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.
मातोश्री रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रभाकर गायकवाड, राजश्री कदम,भीमराव कदम व विष्णू कांबळे यांची यथोचित भाषणे झाली. एकता सुरवसे यांनी माता रमाईच्या जीवन कार्यावरील एक सुंदर असे रमाई गीत सादर केले.
कार्यक्रमाची आभाराने सांगता मंडळाच्या उपाध्यक्षा विश्रांता काळेगावकर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन मातोश्री रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्मा कदम यांनी केले. कार्यक्रमास महिला मंडळाच्या खजिनदार वैशाली कांबळे,सदस्या अश्विनी सरवदे, जयश्री कांबळे तसेच प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी सुनिल कांबळे, नागनाथ सोनवणे, अविनाश काळेगावकर, संजय सरवदे, राम कसबे, संतोष केदारे इ.उपस्थित होते.
Post Views: 15