पंढरपूर – स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर शिक्षक दिन श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचालित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्युनियर कॉलेज पंढरपूर येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेस संस्था सचिव मा. सौ .सुनेत्राताई विजयसिंह पवार यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत शाळेचे संपूर्ण कामकाज दिवसभर सांभाळले. विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर भाषणे केली. विद्यार्थी मंडळांनी शिक्षकांचे पुष्पगुच्छ व स्वतः बनवलेले कार्ड पेपरची फुले व पेढे देऊन सर्वांचे स्वागत केले.
उत्सवानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्था सचिव सौ.सुनेत्राताई पवार यांनी पर्यावरण पूरक फुले व बॅचेस बनवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात आपण आपल्या विद्यार्थी प्रति आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उत्सव असल्याचे सांगून शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे तर मानवाच्या बौद्धिक नैतिक व अध्यात्मिक विकास घडवून आणणारे प्रभावि साधन असल्याचे सांगितले. शिक्षणातून मानवाचा शारीरिक व बौद्धिक विकास होत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी पालक वर्गाबरोबर सुप्रिया मोटे ज्येष्ठ शिक्षिका माधुरी बोडके, इरफान शेख विद्यार्थी मुख्याध्यापिका वैष्णवी राऊत यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता चव्हाण यांनी केले तर आभार साक्षी थोरात यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सह शिक्षिका स्वाती कोळेकर, राजश्री खोत, यांचेसह उमाक्का पाटील ,समृद्धी उन्हाळे ,संध्या फराटे इ. विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले
Post Views: 11