Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वालचंदमध्ये घडतोय यशस्वी आणि मूल्यनिष्ठ जीवनाचा पाया”

तरुण भारतbyतरुण भारत
April 8, 2026
in editor
0
वालचंदमध्ये घडतोय यशस्वी आणि मूल्यनिष्ठ जीवनाचा पाया”
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – “केवळ पदवी नव्हे, तर संस्कारांची जडणघडण हेच खऱ्या शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे,” असा मर्मस्पर्शी संदेश देत परमपूज्य मुनीश्री वीरसागरजी महाराज यांनी वालचंद शिक्षण समूहाच्या नूतन परिसरात विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचा दीप दिला. शिक्षण आणि संस्कार यांचा संगम साधणारी ही भूमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श ठरत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

सोलापूरातील डब्ल्यू.आय.टी. कॅम्पस परिसर आज अध्यात्म, संस्कार आणि भक्तिभावाने भारावून गेला होता. परमपूज्य आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य परमपूज्य मुनीश्री वीरसागरजी महाराज ससंघ यांचे आगमन वाद्यांच्या निनादात आणि जयघोषांच्या गजरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या मुनिसंघात मुनीश्री विशालसागरजी महाराज, धवलसागरजी महाराज, मंथनसागरजी महाराज, मननसागरजी महाराज, विरलसागरजी महाराज तसेच क्षुल्लकश्री विजितजी महाराज यांचा समावेश होता.

वालचंद शिक्षण समूहाच्या नूतन परिसरात आगमनानंतर मुनीश्रींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जीवनात केवळ उपलब्धी (निर्माण) महत्त्वाची नाही, तर आत्मिक समाधान (निर्वाण) साधणे अधिक महत्त्वाचे आहे.” त्यासाठी गुरुभक्ती, त्याग आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे त्यांनी आवाहन केले.

डब्ल्यू.आय.टी. कॅम्पसचे पावित्र्य, शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थ्यांचे शुद्ध आचरण पाहून समाधान व्यक्त करत त्यांनी येथे जैन मंदिर उभारण्याची इच्छाही व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयासाठी समर्पणभाव ठेवून जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जावे, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांनी धर्मपत्नी सौ. माया गांधी यांच्यासह पंचरंगी ध्वज फडकावून मुनीश्रींना अर्घ्य अर्पण केले. योगायोगाने डॉ. गांधी यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सत्कार करून शुभेच्छाही देण्यात आल्या.

मुनीश्री धवलसागरजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात वालचंद शिक्षण समूहाच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेच्या बीजारोपणातून सुरू झालेला हा प्रवास आज संस्कारक्षम शिक्षणसंस्थेच्या रूपाने देशभरात नावारूपाला आला आहे. विविध राज्यांतील जैन विद्यार्थी येथे शिक्षण घेत असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात माहितीची कमतरता नसली, तरी हृदय आणि मेंदू यातील अंतर कमी करण्यासाठी नैतिक व भावनिक विकास अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरूंच्या चरणी शरण जाऊन त्यांच्या उपदेशानुसार आचरण केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भक्ताम्बर विधानाच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, आचार्य मानतुंग यांनी रचलेल्या ४८ कडव्यांमधून जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. भक्ताम्बर उपासनेमुळे मानसिक तणाव कमी होऊन आत्मिक शांती लाभते. “भक्ताम्बरची उपासना करा, धर्म वृद्धिंगत करा आणि आपले घर स्वर्ग बनवा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकताना त्यांनी नमूद केले की, कुटुंबाच्या उन्नतीत स्त्रियांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे मुलींच्या शिक्षणासोबत त्यांच्या सुरक्षेला आणि संस्कारांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाच्या समारोपात त्यांनी अधोरेखित केले की, “उत्तम चारित्र्य, शुद्ध विचार आणि योग्य कृती यांवरच खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन उभे राहते.” वालचंद परिसरात शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना होत असल्याने येथे घडणारे विद्यार्थी निश्चितच समाजाचे आदर्श नागरिक ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post Views: 72
Previous Post

वैयक्तीक कोणत्याही पदासाठी किंवा आपल्या उमेदवारीसाठी सत्तेमध्ये किंवा सत्ताधाऱ्यांसोबत मी जाणार नाही

Next Post

भारताने घेतली ऐतिहासिक झेप …

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भारताने घेतली ऐतिहासिक झेप ...

ताज्या बातम्या

सोलापुरात आनंदाने काम करू शकलो कुमार आशीर्वाद

June 10, 2026

गर्भलिंग निदान परीक्षण प्रतिबंध कायदयाचे आशा वर्कर आरोग्य सेवकांना प्रशिक्षण द्या जिल्हाधिकारी

June 10, 2026

आता अपघात स्थळी वेगाने येणार अँम्ब्युलन्स ;जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा आदेश

June 10, 2026

नुमवि शाळेत विविध विषयांच्या पाट्या घेऊन मुलांचे केले स्वागत

June 9, 2026
MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

June 9, 2026
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

June 9, 2026
शेतात सर्पदंश – औज आहेरवाडी येथील शाळकरी मुलीचा  मृत्यू

शेतात सर्पदंश – औज आहेरवाडी येथील शाळकरी मुलीचा  मृत्यू

June 9, 2026

मोडनिंब येथे सातत्याने बत्तीगुल; नागरिक त्रस्त

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902001

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697