Tuesday, September 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहीद स्मारक हे राष्ट्रसेवा, शिस्त आणि समर्पणाची प्रेरणा देणारे पवित्र स्थान – कर्नल सुनील राजदेव , भारतीय सेनाधिकारी

तरुण भारतbyतरुण भारत
June 28, 2026
in west maharashtra
0
शहीद स्मारक हे राष्ट्रसेवा, शिस्त आणि समर्पणाची प्रेरणा देणारे पवित्र स्थान – कर्नल सुनील राजदेव , भारतीय सेनाधिकारी
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
कुंभेज – देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण व पुण्यस्मरण सोहळा कुंभेज येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी कर्नल राजदेव बोलत होते.
राष्ट्रभक्ती, शौर्य आणि कृतज्ञतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर सुभाष मुटके यांनी एन सी सी कॅडेट सोबत राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक ध्वजस्तंभाकडे नेला. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत व झेंडागीत गायन करून ध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते फीत कापून
शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उपस्थित सेनाधिकारी व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांच्या स्मृतींस अभिवादन केले. यावेळी मा.सेना अधिकारी कर्नल सुनील राजदेव, प्रा. डॉ. गणेश करे-पाटील,ॲड. बाबूराव हिरडे, ह.भ.प. माऊली महाराज पठाडे, विठ्ठल पाटील महाराज, अक्कलकोट देवस्थानचे विश्वस्त भारतराव शिंदे, शहीद जवान माता सोनामाता काटे, वीरपत्नी राणीताई काटे, वीरपुत्र शंभू काटे, सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे, अरविंद निलंगे, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, गजेंद्र पोळ, हनुमंत पाटील, महावीर साळुंके, बिभीषण कन्हेरे, कल्याणराव साळुंके, सुभाष मुटके, प्रा. विष्णू शिंदे, सैनिक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         कर्नल राजदेव आपल्या मनोगतात म्हणाले की, शहीद जवान आप्पासाहेब काटे हे केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राचा अभिमान आहेत. त्यांचे बलिदान हे भारतीय सैनिकांच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचे सर्वोच्च प्रतीक आहे. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांचे स्मरण करणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. कुंभेज येथे उभारण्यात आलेले हे स्मृतीस्थळ भावी पिढीला राष्ट्रसेवा, शिस्त आणि समर्पणाची प्रेरणा देणारे पवित्र स्थान ठरेल. शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि त्यांच्या बलिदानाचा गौरव जपणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजी माजी सैनिक कल्याणकारी मंडळ अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. शहीद जवान आप्पासाहेब यांच्यामध्ये लहानपणापासूनच धाडस, शिस्त आणि देशसेवेची जिद्द दिसून येत होती. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. असे मत व्यक्त केले.
      उपस्थित मान्यवरांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
——————————————
         याच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अनिल कादगे यांनी दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथील विद्यार्थ्यांसाठी सुमारे ₹६५,००० किमतीचा आर.ओ. वॉटर फिल्टर भेट देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. तसेच शिक्षण आणि लोकसेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या वतीने प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांच्या हस्ते त्यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या गौरवाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
———————————————
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे व शिक्षक कल्याणराव साळुंके यांनी केले, सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार मेजर बिभीषण कन्हेरे यांनी आभार मानले.
       शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मृतींना अभिवादन करत राष्ट्रप्रेम, त्याग आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात कायमचा कोरला गेला.
—————————————
“शहीद जवान आप्पासाहेब काटे यांचे स्मारक हे आपल्या समाजाचे प्रेरणास्थान व भावी पिढीच्या मनात राष्ट्रभक्तीची बीजे पेरणारे व्यासपीठ आहे. शहीद स्मृती जपण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा व उपक्रम राबवावेत. यासाठी आपल्या संस्थेचे सहकार्य कायम राहील. सामाजिक कार्यकर्ते अनिल कादगे यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेला आर.ओ. फिल्टर आणि त्यांना प्रदान करण्यात आलेला ‘समाजरत्न’ पुरस्कार ही समाजहिताची प्रेरणादायी उदाहरणे आहेत. अशा कार्यकर्त्यांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडते.”
    – प्रा. डॉ. गणेश करे-पाटील,
संस्थापक अध्यक्ष,  यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे
——————————⸻
“शहीद जवान आप्पासाहेब काटे यांचे बलिदान संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. कुंभेज ग्रामस्थांनी उभारलेले हे स्मृतीस्थळ म्हणजे एका वीर जवानाप्रती व्यक्त केलेली सामूहिक कृतज्ञता आहे. अशा स्मृतीस्थळांमुळे युवकांमध्ये देशभक्ती, त्याग आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होते. शहीदांचे स्मरण केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येक पिढीने जपला पाहिजे. या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
– ॲड. बाबूराव हिरडे
अध्यक्ष, ग्रामसुधार समिती, करमाळा
————————————
“ज्या मातीत शहीद जन्म घेतात ती भूमी तीर्थभूमी बनते. राष्ट्रासाठी प्राणार्पण करणारे वीर कधीही मृत होत नाहीत; ते जनतेच्या हृदयात सदैव जिवंत राहतात. त्यांच्या स्मृतींचे जतन करणे म्हणजे राष्ट्रधर्माचे पालन होय. तरुण पिढीने शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या जीवनातून त्याग, सेवा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचे धडे घ्यावेत. अशा स्मृतीस्थळांमधून समाजात देशप्रेमाची ज्योत सतत प्रज्वलित राहील.”
– ह.भ.प. माऊली महाराज पठाडे, कीर्तनकार व प्रवचनकार
Post Views: 61
Previous Post

येडशी टोलनाक्यावर वाहने थांबवून 127 बालकांना पाजली पोलिओ लस

Next Post

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1208517

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!