वाढत्या गसमुळे दरामुळे सातत्याने चहा बनविणे न परवडणारे झाल्याने आता चहासाठी वापरण्यात येणारी किटली बंद झाली असून प्रत्येक चहाच्या दुकानात किटलीची जागा थर्मासने घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
प्रत्येक चहाच्या दुकानात गिऱ्हाईक मागेल त्या प्रकारचा चहा बनवून दिला जात होता .सातत्याने गसवरती चहाचे भांडे असायचे .गसच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सतत गस सुरु ठेवणे परवड नसल्याने आता चहा हॉटेल मालक ५० ते ५५ कप चहा एकावेळी तयार करून तो मोठ्या थर्मास मध्ये ठेऊन चहाची विक्री करीत करीत आहेत.दुधाचा चहा,कोरा चहा असे दोन प्रकारच्या चहाचे थर्मास ठेवण्यात आले आहेत.तो संपल्यानंतर पुन्हा दुसरा चहा बनविला जात आहे.त्यामुळे सतत गस सुरु ठेवावा लागत नाही त्यामुळे गसची व पैशाची अशी दोन्ही बचत होते
दररोज १२०० ते १५०० कप चहाची विक्री होते.२५ ते ३० कप चहा बनवून तो किटलीत ठेवत होतो .परंतु वाढत्या गस दरामुळे ते परवड नसून आता १०० कप बसणारे दोन थर्मास वापर करीत आहे.थर्मास मुळे चहा गरम रहात आहे. .थर्मास वापरामुळे गस व पैशाची बचत होत आहे.आताचहाच्या दरात एक रुपयाची वाढ करावी लागली आहे.पूर्वी १२५० रु मिळणारा गस सिलेंडर २४०० रुपयापर्यंत गेला आहे.दुधाचा व कोरा चहा व्यतरिक्त चहा मागितल्यास वाढीव पैसे घ्यावे लागतात .
अमीर पठाण ,हॉटेल व्यावसायिक ,माळशिरस
Post Views: 15