Friday, September 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक

तरुण भारतbyतरुण भारत
August 28, 2026
in maharashtra
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल. त्यासाठी कृषी क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन आधुनिकीकरण, नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून उत्पादनखर्च कमी करीत उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचडगाव येथील कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव,  राजाभाऊ वाजे,  भास्कर भगरे, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक असून त्यांची गुंतवणूक करण्याची क्षमता कमी आहे. शेतीचा उत्पादन खर्च वाढतो आहे. या तुलनेत हमीभावामुळे शेतकऱ्यांना विशेष लाभ मिळत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी शेती क्षेत्रातील संशोधनाला चालना द्यावी लागेल आणि हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या महाविद्यालयांची आवश्यकता आहे. या महाविद्यालयातील सुविधा लक्षात घेता नाशिकमध्ये भविष्यात होणाऱ्या कृषी संशोधनात हे महाविद्यालय अग्रेसर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाशिकच्या कृषी प्रगतीचा विशेष उल्लेख करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. येथील शेतकरी अत्यंत मेहनती आहेत. आदिवासी भागातही विविध वनोपज तयार केली जाते. देशाच्या द्राक्ष निर्यातीच्या 80 टक्के निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते. नाशिक जिल्ह्यातला कांदा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

शेती फायदेशीर करायची असेल तर शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग होणे अत्यंत महत्वाचे आहे. देशातील अनेक राज्य कृषी उत्पादकतेत मागे पडली आहेत. रासायनिक खतांच्या अतिउपयोगामुळे मातीची क्षमता कमी झाली आहे. म्हणून राज्य शासन कमी खतांच्या वापरात अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाला चालना देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवे तंत्रज्ञान, नवीन संशोधन याच्या साह्याने कृषी महाविद्यालयांनी जमिनीचा पोत ओळखून खतांचा वापर करण्याचे मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. राज्यात कृषी महाविद्यालयाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. विविध पिकांकरिता उत्पादकता वाढविण्याचे मॉडेल्स तयार करण्यात येत आहेत. महाविद्यालयातील प्रयोग शेतापर्यंत पोहोचावे, शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेवून शेतीला विविध प्रक्रीया उद्योगाशी जोडल्यास मोठी अर्थव्यवस्था उभी राहील. या माध्यमातून शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केल्यास उत्पादन खर्च 25 ते 30 टक्क्यापर्यंत कमी करून उत्पादकता 40 टक्क्यापर्यंत वाढविता येईल. राज्याने यासाठी देशात प्रथमच कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करीत ‘महाविस्तार ॲप’ तयार केले आहे. याद्वारे शेतकऱ्याला संपूर्ण पीकसाखळीचे मार्गदर्शन मिळू शकेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे विविध भाषेत उत्तरे मिळण्याची सुविधा या ॲपमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीत या संस्थेचा मोलाचा वाटा असल्याचे कौतुकोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.

नूतन इमातरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारे ज्ञानमंदिर उभे राहिल्याचे नमूद करून  पालकमंत्री श्री.महाजन म्हणाले, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जडणघडणीत महत्वाचे योगादान आहे. संस्थेला वैभवशाली इतिहास आणि परंपरा आहे. संस्थेतून अनेक नामवंत आणि यशस्वी विद्यार्थी दिले आहेत. अनेक समाजधुरिणींनी शिक्षणातून समाजपरिवर्तन घडविण्यासाठी संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या सदस्यांमध्ये संस्थेविषयी आपलेपणाची भावना असल्याने संस्थेचा विस्तार वेगाने होत आहे. नव्या इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान संपादन करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषी क्षेत्रात वेगाने बदल होत असून हवामान बदलामुळे येणाऱ्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान देऊन सक्षम करावे. कृषी क्षेत्र आणि संबधित क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणारा विद्यार्थी, कृषी क्षेत्रातला शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ महाविद्यालयाने घडवावा, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ‘मविप्र पत्रिका’च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी मनोगतात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, दिलीप बनकर, नितीन पवार,  महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले,  नाशिक महापालिकेचे उपमहापौर विलास शिंदे आदींसह संस्थेचे पदाधिकारी, सभाभद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 25 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. इमारतीच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. या संकुलात महावि‌द्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह इमारत अशा सर्व सुविधायुक्त इमारती आहेत.

०००

Post Views: 34
Previous Post

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना ‘तो राजहंस एक…’ सांगितिक कार्यक्रमातून हृद्य मानवंदना

Next Post

कारागृहातील कैदी बांधवांसोबत साजरे केले रक्षाबंधन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कारागृहातील कैदी बांधवांसोबत साजरे केले रक्षाबंधन

कारागृहातील कैदी बांधवांसोबत साजरे केले रक्षाबंधन

ताज्या बातम्या

ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या डीजे-डॉल्बीवर पूर्णत: बंदीची मागणी योग्यच !

ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या डीजे-डॉल्बीवर पूर्णत: बंदीची मागणी योग्यच !

September 4, 2026
माढ्याच्या पाण्यासाठी पुन्हा संघर्ष;पाटबंधारे विभागाच्या आश्वासनांनंतरही पाणी गायब!

माढ्याच्या पाण्यासाठी पुन्हा संघर्ष;पाटबंधारे विभागाच्या आश्वासनांनंतरही पाणी गायब!

September 4, 2026

ग्रामसेवकांच्या कालबद्ध पदोन्नतीचा मार्ग मोकळा; सप्टेंबरअखेर निर्णय – डेप्युटी सीईओ सूर्यकांत भुजबळ 

September 4, 2026
नेत्रदानातून प्रकाश देणाऱ्यांचा सन्मान, प्रेरणादायी संवादातून नव्या पिढीला दिशा

नेत्रदानातून प्रकाश देणाऱ्यांचा सन्मान, प्रेरणादायी संवादातून नव्या पिढीला दिशा

September 4, 2026

शिक्षकांच्या हातातील खडू हरवला; मोबाईलवर ‘डेटा एन्ट्री’चा भार!

September 4, 2026

दुष्काळ जाहीर करा; सोयाबीनला हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्या

September 4, 2026
सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष; पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष; पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

September 4, 2026

खुनातील आरोपीने इच्छामृत्यू मिळणे बाबत केला न्यायालयात अर्ज! 

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1162519

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!