सांगोला – एसटी स्टॅण्ड परीसरातील चोरीच्या गुन्ह्याची २४ तासाच्या आत उकल करून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी सुवर्णा जगताप ह्या एसटीमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील सोने व पैसे चोरीला गेले होते. याबाबत सांगोला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदारामार्फत माहीती काढून अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी प्रिया रविंद्र काळे (वय-२८) रा.हाजापूर, ता.मंगळवेढा, जि.सोलापूर व मनिषा उर्फ हाजमोला रितेश भोसले (वय- २२) रा.जळवली चौक, करकंब, ता.पंढरपुर, जि.सोलापूर यांना २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन ९० हजार रु. कींमतीचे ३३ ग्रॅम वजनाचे गंठण, १३ हजार रू.कींमतीचे ४ ग्रॅम वजनाचे पॅन्डल, २१ हजार रू.कींमतीच्या ७ ग्रॅम वजनाच्या ३ पिळयाच्या अंगठ्या व एक बदाम तसेच १० हजार रू रोख रक्कम असा एकूण १ लाख ३४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रेरणा कट्टे, उप.विभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोसई.संदीप गुरव, पोहेको.नवनाथ सावंत, मच्छिंद्र राजगे, शिवाजी पांढरे, पोकों.मारुती पांढरे, गणेश काळे, सद्दाम नदाफ, मपोना.कोष्टी, सायबरचे पोकों.सोनकर यांनी केली. पुढील तपास पोहेका.सावंत हे करीत आहेत.