भारती विद्यापीठ, अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ०५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सकाळी ११.०० वाजता पर्यावरणाच्या स्थिरतेमध्ये युवकांचे कर्तव्य व योगदान या विषयावर डॉ. लोहार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .सुरुवातीला इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस बी सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या स्वागत पर भाषणात इन्स्टिट्यूट तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागचे महत्त्व विशद केले. प्रा. शिवगंगा मैंदर्गी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
आपल्या भाषणामध्ये डॉ. आर. आर. लोहार यांनी मनुष्याचे जीवन व पर्यावरणाचे स्त्रोत यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे व त्याकरिता पर्यावरणाचे स्त्रोत यांचे संगोपन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागची कारणेही त्यांनी यावेळी विशद केली. त्याचप्रमाणे भारत हा युवक प्रधान व कृषी प्रधान देश असून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे हे युवकांचे महत्त्वाचे काम असल्याचे सांगितले. वाढत्या गाड्यांमुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे तसेच दिवसेंदिवस जंगलांची संख्या कमी होत आहे व ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय वआंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सी. एस. आर अंतर्गत पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सी. आर. सूर्यवंशी यांनी केले. यावेळेस शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.