पंढरपूर – अधिक महिना व शनिवार, रविवार सुट्टीअसल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरात भाविकांची संख्या वाढली असल्याचे दिसूनयेत आहे. अनेक भाविकांनी खाजगी वाहने आणली आहेत. यामुळे चौका-चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली असल्याचे दिसून येत आहे; मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने भाविक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या शाळांच्या अखरेच्या टप्प्यातआलेल्या उन्हाळी सुट्या त्यामध्येच अनायसा आलेल्या अधिक महिन्यांमध्ये भाविक तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी जातात. तसेच शनिवार, रविवार सलग शासकीय सुट्टी आली असल्यामुळे नोकरदार व इतर नागरिक विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरात दाखल झाले आहेत. अनेक भाविकांनी खाजगी वाहने आणली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पंढरपुरात वाहने दाखल झाली आहेत. यामुळे शहरातील महत्वाच्या चौका चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. चौफाळा, छत्रपती शिवाजीमहाराज चौक, सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, सांगोला चौक, अर्बन बँक चौकआदी परिसरात गोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली असल्याचे दिसून येत आहे. याचा त्रास भाविक तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागल्याने एकंदरीतच नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
अधिक महिन्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची संख्या वाढणार असल्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे होते; मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्षअसल्यामुळे याचा त्रास भाविकतसेच शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.
Post Views: 19