पंढरपूर – येथील स्वेरी कॉलेजऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त वृक्षारोपण हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. यामध्ये विविध प्रकारच्या रोपट्यांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. शुक्रवारी (दि.५ जून) स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी
स्वेरी कॅम्पसमध्ये रोपट्यांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाची सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणेम्हणून इस्कॉन, कोल्हापूर येथील पुरुषोत्तम आनंददास महाराज तसेच केरले (जि.कोल्हापूर) मधील हनुमान हायस्कूलचे रणदिवे व आदी उपस्थित होते. या बरोबरच स्वेरी संचलित कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.सतीश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एन. ए. तळवलकर, कॉम्प्यूटरसायन्स अँड इंजिनिअरिंगच्या डॉ. वनिता जाधव, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर आणि एमबीएच्या डॉ. मिनल भोरे, ग्रीन टीमचे समन्वयक प्रा. कुलदीप पुकाळे, राष्ट्रीय सेवायोजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे तसेच प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येनेउपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन,वृक्षसंवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेत पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त आयोजिलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास तसेच हरित भविष्याच्या निर्मितीस चालना मिळणार आहे, हे मात्रनक्की.
—————–
चौकट : ( आठ हजार झाडांनी बहरला स्वेरी कॅम्पस )
स्वेरीचा संपूर्ण कॅम्पस
हा ‘ग्रीन कॅम्पस’ म्हणून ओळखलाजातो. भारताचे ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी स्वेरीच्या प्रांगणात लावलेल्या झाडांचे आजही संगोपन केले जात आहे. स्वेरीतआजपर्यंत सुमारे आठ हजार झाडे लावण्यात आलेली आहेत.
Post Views: 30